निलंगा : लातूर जाहिराबाद हलगरा पाटी ता. निलंगा पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवाजी गुदळे यांच्या शेताजवळ शनिवारी दुपारी तीन वाजता टु व्हीलर व क्रुझर यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात टु व्हीलरवरील आई वडील व मुलगा यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, निलंगा नगर परिषदमध्ये स्वच्छता विभागात कार्यरत असलेले क्रांतीकुमार काशिनाथ कांबळे (वय 50) हे आपल्या वडिलांना घेवून गुत्ती ता. बसवकल्याण येथे बहीणीच्या सास-याच्या दशक्रिया कार्यक्रमासाठी दि.16 रोजी गेले होते. तो कार्यक्रम उरकून आज दि.17 रोजी दुपारी दोन आई वडील यांना आपल्या गाडी क्रमांक MH24-BC -2293 वरुन निलंगा निघाले होते. हलगरा ता. निलंगा येथील शिवाजी गुदळे यांच्या शेताजवळ आले असता निलंगा मार्गे येणारी क्रुझर क्रमांक MH24 BX - यांची समोरासमोर धडक झाली.
क्रुझर गाडी मुलगा व आई वडील यांच्या अंगावरून गेल्याने गुप्तांगावर जबर जखम झाली. यामध्ये या तिघांचा जागीच मृत्यू झाला. विलास माधव कांबळे यांच्या फिर्यादीवरून औराद शहाजानी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. घटनास्थळी तात्काळ सपोनि विठ्ठल दुरपडे, लतीफ सौदागर, व विश्वनाथ डोंगरे यांनी भेट देत जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र हलगरा ता. निलंगा येथे दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. एस एस मुळजे यांनी मयत घोषित केले.
घटना स्थळांचा पंचनामा करुन मयतांचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय निलंगा येथे पाठवण्यात आले असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लतीफ सौदागर व विश्वनाथ डोंगरे हे करीत आहेत.