Latur voter list 2026 pudhari photo
लातूर

Latur voter list 2026 : लातूर जिल्ह्यात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

१७ लाख ९० हजार ८ मतदार; दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत

पुढारी वृत्तसेवा

लातूर : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवारी (३१ ऑगस्ट) प्रसिद्ध करण्यात आली. जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत एकूण १७ लाख ९० हजार ८ मतदार असून, प्रारूप यादीबाबत दावा, हरकत अथवा नोंदीतील दुरुस्ती असल्यास संबंधितांनी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यातील २१४७ मतदान केंद्रांवर प्रारूप मतदार यादी तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. लातूर ग्रामीणमध्ये दोन लाख ९६ हजार ६६, लातूर शहरात तीन लाख ३७ हजार ८१६, अहमदपूरमध्ये तीन लाख ७ हजार ८४६, उदगीरमध्ये दोन लाख ८७ हजार १९६, निलंग्यात दोन लाख ९१ हजार ९७ आणि औसा मतदारसंघात दोन लाख ६९ हजार ९८७ मतदार आहेत.

प्रारूप यादीत जिल्ह्यात ६८ हजार ७४४ नो मॅपिंग मतदार तसेच वय, नाव आणि नातेसंबंधातील विसंगती असलेले एक लाख ५६ हजार ५५९ मतदार आढळले आहेत. संबंधित मतदारांना सुनावणीद्वारे आवश्यक पुरावे सादर करण्याची संधी दिली जाणार आहे. अशा मतदारांना ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबरदरम्यान नोटिसा बजावण्यात येणार असून, सुनावणीनंतर नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, गणक प्रपत्र प्राप्त न झालेल्या दोन लाख १४ हजार ४८१ मतदारांची नोंद अनकलेक्टेबल म्हणून करण्यात आली आहे. यामध्ये मृत, गैरहजर, स्थलांतरित तसेच अन्य ठिकाणी नोंदणीकृत मतदारांचा समावेश आहे. १ ऑक्टोबर २०२६ ही अर्हता तारीख असून, त्या दिवशी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांनाही मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना सहामध्ये दावा दाखल करता येईल.

  • प्रारूप यादीतील नावाचा समावेश, वगळणे किंवा तपशीलाबाबत हरकत असल्यास नमुना सहा, सात किंवा आठमध्ये अर्ज करावा.दावे-हरकती संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष अथवा पोस्टाद्वारे दाखल करता येतील. प्रारूप मतदार यादी लातूर जिल्ह्याच्या https://latur.nic.in याअधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT