Udgir crime news 
लातूर

Udgir crime news : उदगीरमध्ये २१४३ कोटींचा परदेशी निधी घोटाळा उघड

आयकर विभागाच्या तक्रारीवरून १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

उदगीर : शहरात परदेशी निधी पाठवण्याच्या नावाखाली तब्बल २१४३ कोटी ७९ लाख ४३ हजार ७६० रुपयांची महा-फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आयकर विभागाने दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे गुन्हा

पोलीस स्टेशन उदगीर शहर येथे गु.र.नं. ३६९/२०२६, कलम ३१८(४), २३४, २२९, ३(५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील फिर्यादी दीपक कुमार, उप आयकर संचालक, युनिट-१, औरंगाबाद* यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी श्याम शिवप्रसाद कलानी, रा. न्यू मोंढा रोड, उदगीर आणि इतर १६ कंपन्यांनी संगनमत करून सन २०२२-२३ ते २०२५-२६ या कालावधीत परदेशी निधी पाठवण्याच्या व्यवहाराचे खोटे प्रमाणपत्र दिले. या खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे चुकीच्या पद्धतीने २१४३ कोटींहून अधिकचा निधी परदेशात पाठवण्यास सहाय्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हा संपूर्ण व्यवहार दिनांक ०१/०४/२०२२ ते ३१/०३/२०२६ या कालावधीत न्यू मोंढा रोड, उदगीर येथून झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सदर गुन्हा २१/०८/२०२६ रोजी रात्री २२.५८ वाजता दाखल करण्यात आला असून याची नोंद इंट्री नं. २८ वर घेण्यात आली आहे. गुन्हा दाखल करणारे अंमलदार पोउप नि, रेडेकरआहेत.पोलीस अधीक्षक, लातूर यांच्या आदेशाने या गुन्ह्याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उप अधीक्षक श्रीमती भगीरथी पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पो. नि. श्री. भुसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.या गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम २१४३ कोटींपेक्षा जास्त असून, अद्याप कोणताही मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला नाही. हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे उदगीर शहरासह लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या मोठ्या आर्थिक घोटाळ्याचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT