shivraj motegaonkar  Pudhari
लातूर

NEET Coaching Superstition Video: लातूरमध्ये कोचिंग क्लासचा व्हिडिओ व्हायरल; अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आक्षेप

एम्स प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांवर तांब्याच्या पाण्याचा शिंपडण्याचा प्रकार; अंनिसचा तीव्र आक्षेप

Sakshi Kadam

लातूर: नीट पेपरफुटीच्या आरोपानंतर आरसीसी क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर ‌‘एम्स‌’मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांवर तांब्याच्या भांड्यातील पाणी शिंपडतानाचा नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या प्रकारावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) आक्षेप घेतला असून, दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. या व्हिडीओमध्ये प्रा. मोटेगावकर चक्क वर्गातील बेंचवर उभे असल्याचे दिसत आहेत. त्यांच्या एका हातात पाण्याचा तांब्या आणि दुसऱ्या हातात आंब्याची पाने असून, ते या पानांच्या साहाय्याने तांब्यातील पाणी समोर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर शिंपडत आहेत.

एवढ्यावरच न थांबता, हे पाणी शिंपडत असताना ते विद्यार्थ्यांना उद्देशून मोठ्याने ओरडून सांगत आहेत की, तुम्ही सर्वजण थेट ‌‘एम्स‌’ला लागणार आहात आणि हा योग अनेक वर्षांनंतर आला आहे! असे ते व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT