लातूर : चाकुर येथील छावा संघटनेचे कार्यकर्ते कृष्णा धोंडगे यांनी मंगळवारी दुपारी येथील जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर स्वतःवर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला . तेथे उपस्थित पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. कृष्णा धोंडगे यांने कृषीमंत्री कोकाटे यांनी राजीनामा न दिल्यास आपण मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे फेसबुक लाईव्ह मधून सोमवारी सांगितले होते.
त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त होता. दरम्यान मंगळवारी दुपारी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात घोषणा देत धोंडगे व छावा चे काही कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर आले . यावेळी धोंडगे स्वतः सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घतले. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणीच्या यावेळी धोंडगे व छावाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला.