Prashasakraj Pudhari
लातूर

Latur Gram Panchayat News | चाकूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीवर येणार प्रशासकराज

Chakur News | फेब्रुवारी महिन्यात संपणार कार्यकाळ

पुढारी वृत्तसेवा

Chakur Gram Panchayat Administrator

चाकूर : चाकूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपत असल्यामुळे या ग्रामपंचायतीवरील सरपंचांचा कारभार संपून प्रशासकराज येणार आहे. त्यामुळे आता लोकप्रतिनिधी ऐवजी प्रशासकीय यंत्रणेमार्फत विकासकामे राबवत कारभार चालविला जाणार आहे.

चाकूर तालुक्यात ७१ ग्रामपंचायती असून यापैकी २४ ग्रामपंचायतीची निवडणूक पाच वर्षांपूर्वी झाली होती. फेब्रुवारी महिन्यात या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपणार आहे. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक सुरू असून निवडणूक आयोगाकडून मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर करण्यात आला नाही. ग्रामपंचायतीच्या निवडणूक सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे फेब्रुवारी महिन्यापर्यंत घेता येऊ शकत नाहीत. यामुळे या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.

त्यामुळे मुदत संपणाऱ्या तालुक्यातील कबनसांगवी, अजनसोंडा बु., रोहीणा, वडवळ नागनाथ, शेळगाव, शिवणखेड, उजळंब, कडमुळी, केंद्रेवाडी, जगळपुर खु., झरी खु., टाकळगाव, दापक्याळ, नळेगाव, नागेशवाडी, बावलगाव, बोरगाव, ब्रम्हवाडी ये., महाळंगी, महाळंग्रा, महाळंग्रावाडी, राचन्नावाडी,

लिंबाळवाडी, हाडोळी या ग्रामपंचायतीवर निवडणूक होईपर्यंत प्रशासक येणार आहेत व विकासकामांचे निर्णय प्रशासकीय पातळीवर घेतले जाणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक झाल्यानंतर निवडणूक आयोगाने लवकरात लवकर ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान, याबाबत गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे म्हणाले, मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक करण्यात येणार आहे. यापूर्वी तालुक्यातील ७१ पैकी ४७ ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून झालेली आहे. आता मुदत संपणाऱ्या या चोवीस ग्रामपंचायतीत पहिल्यांदाच सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असून जि. प. व प. सं. निवडणुकीनंतर गावपातळीवर निवडणुकीचा आखाडा रंगणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT