Latur News : स्कूटीवरून ३६ हजारांचा गुटखा नेणाऱ्यास पकडले

लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १ फेब्रुवारी रोजी सकाळी स्कुटीवरून अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या एका इसमास ३६ हजारांच्या गुटख्यासह रंगेहाथ पकडले.
A man transporting gutkha worth 36,000 rupees on a scooter was apprehended
स्कूटीवरून ३६ हजारांचा गुटखा नेणाऱ्यास पकडलेfile photo
Published on
Updated on

A man transporting gutkha worth 36,000 rupees on a scooter was apprehended

लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १ फेब्रुवारी रोजी सकाळी स्कुटीवरून अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या एका इसमास ३६ हजारांच्या गुटख्यासह रंगेहाथ पकडले. शैलेश अंबादास पारसेवार असे आरोपीचे नाव असून या प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A man transporting gutkha worth 36,000 rupees on a scooter was apprehended
केंद्रीय अर्थसंकल्प विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा : आ. संभाजी पाटील निलंगेकर

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली शहरात अवैध धंद्यांची माहिती संकलित केली जात असताना विवेकानंद चौक पोलीस स्टेशन हद्दीत एका स्कुटीवरून गुटखा नेला जात असल्याची माहिती मिळाली.

या माहितीआधारे एक फेब्रुवारी सकाळी ९.४० वाजता नाईक चौक ते कंदील चौक रोडवर पांढऱ्या रंगाच्या अॅक्टिव्हा स्कूटीच्या (क्र. एपी २३ एजी ७७ ७०) डिक्कीमध्ये व पाय ठेवण्याच्या जागी पांढऱ्या पोत्यामध्ये व निळ्या बॉक्समध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा घेऊन जाताना आरोपी शैलेश अंबादास पारसेवार (वय ५१, रा. ब्लॉक नं. १९, कनेरी रिंग रोड, साई सृष्टी रो हाऊस, देसाई नगर, लातूर) मिळून आला.

A man transporting gutkha worth 36,000 rupees on a scooter was apprehended
Latur News : लातूर जिल्ह्यात बहरल्या आमराई

झडतीदरम्यान विमल पान मसाला, रजनीगंधा पान मसाला, तंबाखूजन्य पदार्थांचे विविध पुडे, असा एकूण ३६,७०० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व स्कुटी असा एकूण १ लाख ६,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे, आनंद हल्लाळे व प्रवीण कोळसुरे यांनी पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news