अशोक बाबुराव जाधव Pudhari
लातूर

Electrocution Death Latur | झाडावर पाला तोडताना शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

शेळीसाठी पाला तोडताना चाकूर तालुक्यातील झरी (बु.) येथे दुर्दैवी घटना

पुढारी वृत्तसेवा

Farmers Dies Of Electric Shock

चाकूर : तालुक्यातील झरी (बु.) येथे शेळीसाठी पाला आणण्यासाठी झाडावर चढलेल्या व्यक्तीचा विद्युत प्रवाहाचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून काही काळ मृतदेह झाडावरच लटकलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, झरी (बु.) येथील रहिवासी अशोक बाबुराव जाधव (वय ४५) हे शुक्रवारी सकाळी शेळीसाठी पाला आणण्यासाठी शेतात गेले होते. झाडावर चढून फांद्या तोडत असताना त्यांचा संपर्क विद्युत वाहिनीच्या मुख्य तारेस आला. त्यामुळे त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक किरण रायझुबे व सहकारी चामले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जानवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला.

अशोक जाधव हे सामान्य कुटुंबातील असून त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गमावल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT