Nanded-Latur direct railway : नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्ग दृष्टिक्षेपात

डीपीआरचे काम अंतिम टप्प्यात; १०४ किमीचे सर्वेक्षण पूर्ण
Nanded-Latur direct railway
Nanded-Latur direct railway : नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्ग दृष्टिक्षेपात pudhari photo
Published on
Updated on

Nanded-Latur direct railway line in sight

नांदेड, पूढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातील दोन प्रमुख व्यापारी आणि शैक्षणिक केंद्रे असलेल्या नांदेड आणि लातूर शहरांना जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित थेट रेल्वेमार्गाच्या निर्मितीला आता खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह यांनी माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांना विशेष पत्राद्वारे ही महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक माहिती दिली आहे.

क्षेत्रीय सर्वेक्षण पूर्ण, 'डीपीआर' प्रगतीपथावर रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसारः एकूण लांबीः नांदेड ते लातूर रोड दरम्यानचा हा नवीन थेट रेल्वे मार्ग सुमारे १०४ किलोमीटर लांबीचा असेल.

पर्यायी संपर्कः या नवीन मार्गामुळे दोन्ही शहरांदरम्यान प्रवासाचे अंतर कमी होऊन एक जलद आणि पर्यायी रेल्वे संपर्क उपलब्ध होईल. सद्यस्थितीः या प्रकल्पाचे क्षेत्रीय सर्वेक्षण (Field Survey) यशस्वीरित्या पूर्ण झाले असून, सध्या सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

मराठवाड्याच्या दळणवळणात क्रांती ! नांदेड आणि लातूर ही दोन्ही शहरे उद्योग, शिक्षण आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. या थेट रेल्वे लिंकमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून मालवाहतुकीला मोठा फायदा होणार आहे. रेल्वे बोर्डाच्या या सकारात्मक पावलामुळे मराठवाड्यातील या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांदरम्यान थेट रेल्वे धावण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

खा. चव्हाणांच्या पाठपुराव्याला यश

खासदार अशोकराव चव्हाण यांनी ९ मार्च २०२६ रोजी राज्यसभेत नांदेड ते लातूर थेट नवीन रेल्वेमार्गाचा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे उपस्थित केला होता. मराठवाड्याच्या दळणवळणाच्या आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने हा मार्ग किती आवश्यक आहे, याकडे त्यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत रेल्वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रखनीत सिंह यांनी पत्राद्वारे या प्रकल्पाची सद्यस्थिती स्पष्ट केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news