Body Found  File Photo
लातूर

Latur Crime | चाकूर बायपासवर अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला

ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न; माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Chakur Bypass Body Found

चाकूर : नांदेड–लातूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील चाकूर बायपास परिसरात तहसील कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस डिव्हायडरमध्ये अंदाजे ७० ते ७५ वर्षे वयाच्या अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.

सोमवारी (दि. १४) परिसरातील नागरिकांना डिव्हायडरमध्ये वृद्धाचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच चाकूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

मृत वृद्धाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यांची ओळख पटविण्यासाठी चाकूर पोलिसांकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. मृत वृद्धाच्या अंगावरील कपडे, शरीरयष्टी तसेच इतर बाबींच्या आधारे ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

या वृद्ध व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास किंवा ते त्यांच्या परिचयातील असल्यास चाकूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. याबाबत पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्याशी ९८२३१२२२८४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT