Jayashree Nagargoje Chairperson , Bhujang Shinde Deputy Chairperson Pudhari
लातूर

Chakur PS Election | चाकूर पंचायत समिती सभापतीपदी जयश्री नागरगोजे, उपसभापतीपदी भुजंग शिंदे बिनविरोध

Latur Local Politics | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पंचायत समिती परिसरात फटाके फोडून जल्लोष

पुढारी वृत्तसेवा

Jayashree Nagargoje Chairperson Chakur Panchayat Samiti

चाकूर : चाकूर पंचायत समितीच्या सभापतीपदी जयश्री नागरगोजे यांची तर उपसभापतीपदी भुजंग शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभापती व उपसभापती निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोमवारी (दि. ९) सकाळी १० वाजता पंचायत समिती सभागृहात विशेष सभा घेण्यात आली. ही बैठक तहसीलदार तथा पिठासीन अधिकारी नरसिंग जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी सभापतीपद ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला’ या आरक्षणासाठी निश्चित करण्यात आले होते. सभापती आणि उपसभापती पदासाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत पार पडली.

सभापतीपदासाठी रोहिणा गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री मच्छिंद्र नागरगोजे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. तर उपसभापतीपदासाठी सुगांव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे भुजंग शिंदे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. इतर कोणताही अर्ज न आल्याने पिठासीन अधिकारी नरसिंग जाधव यांनी दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

यावेळी पंचायत समितीचे सचिव तथा गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे, सदस्य सावित्रीबाई केदार, मनिषा जाधव, गजानन होनराव, सुप्रिया हाक्के, संतोष कलवले, मिरावती कसबे, विजयमाला शेळके, शिवम देवशेटवार आदी उपस्थित होते.

निवडीनंतर पिठासीन अधिकारी नरसिंग जाधव यांनी नवनिर्वाचित सभापती जयश्री नागरगोजे व उपसभापती भुजंग शिंदे यांचा सत्कार केला. या निवडीचे स्वागत करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पंचायत समिती परिसरात फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT