IMA Latur Provided Shelter to the Hardworking
लातूर, पुढारी वृत्तसेवा : कडाक्याच्या उन्हातही पोटासाठी राबणाऱ्या कष्टकऱ्यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र दिनी इंडीयन मेडीकल असोसिएशन लातूर शाखेच्या वतीने कष्टकऱ्यांना छत्र्या टोप्या, पाणी बॉटल्स, ओआरएस पाकीटें, छोटे पंखे, स्टॉल अंबरेलाज आदींचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना उन्हापासून आरोग्याची काळजी कशी घ्यावी ? याबाबत माहिती सांगितली. याशिवाय शहर वाहतुक सुरळीत करण्यासाठी योगदान देणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांनाही टोप्या, पाण्याच्या बॉटल्स देण्यात आल्या. त्या स्विकारताना कष्टकऱ्यांच्या चेहर्यावर कृतज्ञतेचा भाव दाटून आला होता.
गंजगोलाई येथे आयएमए लातुरचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन राऊत, डॉ. शुभांगी राऊत, डॉ. अशोक पोद्दार, डॉ. चेतन सारडा, डॉ. अब्दुल हमीद चौधरी, डॉ. संजय पाटील, डॉ. संजय वडार, डॉ. अनिल राठी, डॉ. स्नेहल देशमुख, डॉ. मेघा गुगले यांनी वस्तुंचे वाटप केले.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे डॉ. आकांक्षा अवस्थी व डॉ. वेदांत, डॉ. अभय कदम, डॉ. अनुजा कुलकर्णी, डॉ. विश्वास कुलकर्णी, डॉ. वैशाली दाताळ, डॉ. राजकुमार दाताळ, डॉ. सुभाष गोरे, डॉ. राखी सारडा, डॉ. अमित उटीकर, डॉ. राजेश शाह, डॉ. सुमीत वाघमारे, डॉ. राजश्री सावंत, डॉ. दीपक गुगळे राजीव गांधी चौक येथे डॉ. इंदिरा पाटील, डॉ. सुमित पाटील, डॉ. किरण डावळे, डॉ. कल्याण बरमदे, डॉ. सूर्यकांत निसाळे, डॉ. अजय जाधव, डॉ. वाळासाहेब जाधव, डॉ. आनंद कलमे, डॉ. रचना जाजू,
डॉ. शैला सोमाणी, डॉ. शिरीष पाटील, डॉ. अयाज शेख, डॉ. स्नेहल देशमुख, मेधा कोटलवार, चंद्रज्योती बांदखडके यांनी रेणापूर नाका येथे आयएमए लातूरचे सचिव डॉ. विश्रांत भारती व डॉ. मन्सूर भोसगे,, डॉ. रवींद्र इरपतगिरे, डॉ. संदीप कवठाळे, डॉ. राजेश एनाडले, डॉ. अनघा राजपूत, डॉ. अशोक अरडवाड, डॉ. आरती झंवर, डॉ. ब्रिजमोहन झंवर, डॉ. मिलिंद पोतदार,
डॉ. चाँद पटेल, डॉ. धनंजय पडवळ, डॉ. विमल डोळे, डॉ. प्रशांत कापसे यांनी तर कणेरी चौक येथे महिला विंगच्या अध्यक्षा डॉ. श्वेता काटकर पवार, गणेश पवार, डॉ. महादेव बन्सोडे, डॉ. गिरीश कोरे, डॉ. किरण गोजमगुंडे, डॉ. संतोष डोपे, डॉ. सुरेखा काळे, डॉ. उमेश कानडे, डॉ. सुबोध सोमाणी, डॉ. मुकुंद भिसे, डॉ. सुरेखा निलंगेकर, डॉ. विकास साळुंके, डॉ. मंगेश सेलुकर, डॉ. राहुल सुळ, डॉ. दीपक दाडगे, डॉ. हनुमंत किनीकर यांनी कष्टकयाँना वस्तुंचे वाटप केले.