Latur News : घरकुल लाभार्थीना मिळणार गायरानमधून जागा Pudhari File Photo
लातूर

Latur News : घरकुल लाभार्थीना मिळणार गायरानमधून जागा

पंचायत समितीच्या पाठपुराव्याला मिळाले यश

पुढारी वृत्तसेवा

Housing scheme beneficiaries to get land from grazing land

लासूर स्टेशन, पुढारी वृत्तसेवा : जागेअभावी घरकुल बांधण्यास लाभार्थ्यांना अडचण निर्माण होत होती. या लाभार्थ्यांना शासनाच्या धोरणाप्रमाणे गायरान जागा जमिनीमधून मिळण्यासाठी आमदार प्रशांत बंब यांनी तहसील तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी बैठका घेऊन शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते.

गंगापूर पंचायत समितीच्या सभापती कविता रवींद्र चव्हाण यांनी यासाठी पाठपुरावा केला. गंगापूर पंचायत समिती मार्फत एकूण ११ ग्रामपंचायतचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे सादर करण्यात आले होते.

सदर प्रस्तावापैकी एकूण पाच ग्रामपंचायतींच्या ७८ लाभार्थ्यांना गायरानमधून जागा उपलब्ध करून देण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे. सदर आदेशामुळे घरकुल लाभार्थ्यांचा जागेचा प्रश्न सोडण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार असून याचा त्यांना लाभ होणार आहे.

बाबतीत मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्प संचालक वासुदेव सोळुंके, पंचायत समिती गट विकास अधिकारी सुहास वाकचौरे, उपसभापती राजेंद्र हिवाळे, सहायक गटविकास अधिकारी अक्षय भालेकर, घरकुल कक्षप्रमुख सुजय उज्जैनकर, ऑपरेटर किशोर गायकवाड व डीआरडीएची टीम यांनी विशेष प्रयत्न केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT