Heavy rains wreak havoc again in Udgir taluka
जावेद शेख
उदगीर : तालुक्यातील बोरगाव अतिवृष्टीमुळे पुन्हा एकदा पुराचे पाणी शिरले आहे. प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. तालुक्यातील नदी नाले व ओसडून वाहत आहेत. तालुक्यात पुराचा फटका बसलेल्या उदगीर तालुक्यातील एकमेव बोर गावात पुन्हा पुराचे पाणी शिरल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बोरगावात शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले घरात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेले होते. त्यांना अद्याप शासकीय मदत मिळते न मिळते तेच पुन्हा एकदा संकट ओढावले आहे बोरगावात पाणी शिरले असून घराच्या अंगणापर्यंत पाणी गेले आहे.
आमदार संजय बनसोडे, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे तहसीलदार राम बोरगावकर यांनी बोरगावला भेट देऊन पहाणी केली. बोरगावच्या पुलावरून पाणी वाहत आहे उदगीर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अनेक गोरगरिबांच्या घरात पाणी शिरल्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर आले आहे याकडे प्रशासनाने गोरगरीब लोकांना शासनाची मदत मिळून द्यावी अशी मागणी होत आहे.
उदगीर तालुक्यातील लोणी या गावातील अनेक घरात पाणी शिरल्यामुळे लोकांच्या खाण्यापिण्याचे अन्नधान्य भिजल्यामुळे आज लोक उघड्यावर आले आहेत लोणी गावात घरात शिरलेल्या पाण्याची तलाठ्याने पाहणी करून शासनाची मदत मिळवून देण्याचे प्रयत्न करू असे सांगितले, हळी येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे हाळी येथील खाजा मेहनदीन तांबोळी यांच्या शेतात नदीपात्राच्या कडेला असलेल्या शेड मधील नदीचे पाणी शिरून २ म्हशी व देवणी जातीचे श्गाय मृत्यू झाला आहे.