एमपीडीए कायद्यांतर्गत सराईत गुन्हेगार वर्षभरासाठी स्थानबद्ध File Photo
लातूर

MPDA Act detention : एमपीडीए कायद्यांतर्गत सराईत गुन्हेगार वर्षभरासाठी स्थानबद्ध

5 फेब्रुवारी 2026 रोजी स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित

पुढारी वृत्तसेवा

लातूर : लातूर शहर आणि परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आणि सार्वजनिक सुव्यवस्थेस धोका ठरणाऱ्या एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार शाम सुरेश पवार (वय 25, रा. वरवंटी) याच्यावर एमपीडीए अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करून त्याला एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आरोपी शाम पवार हा लातूर शहर आणि एमआयडीसी परिसरात वारंवार बेकायदेशीर आणि समाजविघातक कृत्ये करत होता. त्याच्या गुन्हेगारी इतिहासामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी पाठवलेल्या प्रस्तावावर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी बारकाईने परीक्षण केले. साक्षीदारांचे जबाब, गोपनीय अहवाल आणि गुन्ह्यांचे स्वरूप लक्षात घेऊन 5 फेब्रुवारी 2026 रोजी त्याच्या स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, आणि उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक समाधान चवरे, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर सानप, भीमराव बेल्लाळे, विष्णू वायगावकर, बळवंत भोसले, राजाभाऊ म्हस्के आणि अक्षय डिगोळे यांनी केली.

हर्सूल कारागृहात रवानगी

या आदेशाची अंमलबजावणी करत 8 फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिसांनी आरोपी श्याम पवारला ताब्यात घेतले. त्याला आता मध्यवर्ती कारागृह, हर्सूल रोड, छत्रपती संभाजीनगर येथे एक वर्षाच्या कालावधीसाठी पाठवण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT