Latur news : स्पर्धा परीक्षेसह एसएससी परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन file photo
लातूर

Latur news : स्पर्धा परीक्षेसह एसएससी परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन

मेळाव्यात नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा, मंथन परीक्षा, डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, एनएमएमएस तसेच एसएससी बोर्ड परीक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

पुढारी वृत्तसेवा

Guidance for preparing for competitive examinations, including SSC exams

लातूर, पुढारी वृत्तसेवा : जेएसपीएम, लातूर द्वारा संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय, लातूर येथे इयत्ता 5 वी ते 10 वीच्या विविध स्पर्धा परीक्षा तसेच एसएससी बोर्ड परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी 'ध्येयवेध' पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आगामी परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध तयारी करून यश संपादन करावे, या उद्देशाने या मेळाव्यात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

मेळाव्यात नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा, मंथन परीक्षा, डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, एनएमएमएस तसेच एसएससी बोर्ड परीक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक इयत्तेसाठी परीक्षेपर्यंत उपलब्ध असलेला कालावधी लक्षात घेऊन अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, सराव परीक्षांचे महत्त्व, नियमित अभ्यास आणि पालकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच दिवाळी सुट्टीचा शैक्षणिकदृष्ट्या प्रभावी उपयोग व्हावा, यासाठी विद्यार्थ्यांना विशेष अभ्यास साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्राचार्य मारुती सूर्यवंशी, प्राचार्य गोविंद शिंदे, उपमुख्याध्यापिका अलका अंकुशे, उपमुख्याध्यापक प्रभाकर सावंत, गणेशराव कदम, बाळाराम पिचारे, पालक प्रतिनिधी काळदाते, गायकवाड, शालेय स्पर्धा परीक्षा विभागप्रमुख संगादेव आवस्कर, संगीता जगताप, श्वेता भुमकर, सुप्रिया सरसंबे, राधा कवरे, विद्यावर्धिनी गायकवाड, भगवंत कलेढले, विनोद सूर्यवंशी, ज्योतीराम तवर, आकाश आवस्कर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT