Latur News : पीकविमा अंमलबजावणीची जबाबदारी सरकारी विमा कंपनीला द्या  File Photo
लातूर

Latur News : पीकविमा अंमलबजावणीची जबाबदारी सरकारी विमा कंपनीला द्या

लातूर जिल्ह्याकरिता आमदार अभिमन्यू पवारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

पुढारी वृत्तसेवा

Give the responsibility of implementing crop insurance to the government insurance company.

लातूर, पुढारी वृत्तसेवा: प्रीमियम सबसिडी देत, राज्य व केंद्र सरकारने लातूर जिल्ह्यासाठी गतवर्षी दलेल्या एसबीआय पीकविमा कंपनीचे लातूर जिल्ह्यासाठी असलेले अॅग्रीमेंट ऐवजी आयसीआयसीआय लोम्बार्ड या खासगी कंपनीला लातूर जिल्हा पीकविम्यासाठी करारबद्ध करण्याचे सुरू असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांना समजल्यानंतर त्यांनी याबाबत तत्काळ लक्ष घालून लातूर जिल्ह्यासाठी खासगी नव्हे तर सरकारी पीकविमा कंपनी मिळेल यासाठी लातूर जिल्ह्यात पीकविमा योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी सरकारी विमा कंपनीबर द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

आमदार अभिमन्यू पवार यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली. पोलिस पाटील बांधवांच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वरून वाढवून ६५ करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत असून या मागणीचा सकारात्मक विचार करावा तसेच औसा मतदारसंघातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांच्या सुधारणा कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा व औसा शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी लागत असलेला अतिरिक्त निधीही उपलब्ध करून देण्यात यावा, अशीही मागणी यावेळी आ अभिमन्यू पवार यांनी केली.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळा अनावरणासाठी विनंती

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे पक्ष बळकटीसाठी मोठे योगदान लाभले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या लातूर जिह्यात भाजप पक्ष बळकट करण्यात मुंडे यांनी मोठे परिश्रम घेतले. लातूर जिल्हा परिषदेसमोर काही वर्षांपूर्वी त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे, त्याचे अनावरण आपल्या हस्ते व्हावे अशी विनंती आ. अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना यावेळी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT