Gangabai Kodalikar Thorat Chairperson  Pudhari
लातूर

Ausa PS Election | औसा पं.स सभापतीपदी गंगाबाई कोदळीकर थोरात, उपसभापतीपदी अमोल पाटील

Latur Politics | सभापतीपद ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग’ या प्रवर्गासाठी राखीव

पुढारी वृत्तसेवा

Gangabai Kodalikar Thorat Chairperson Amol Patil Deputy Chairperson

औसा : औसा पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या गंगाबाई माणिकराव कोदळीकर थोरात यांची, तर उपसभापतीपदी भाजपचे अमोल साहेबराव पाटील यांची निवड झाली. सभापती व उपसभापती पदांसाठी सोमवारी (दि.९) पंचायत समिती सभागृहात झालेल्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आयोजित बैठकीस उपविभागीय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी अविनाश कोरके अध्यक्षस्थानी होते. सभापतीपद ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग’ या प्रवर्गासाठी राखीव होते. नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत पार पडली.

सभापतीपदासाठी आलमला गणातून भाजपच्या गंगाबाई कोदळीकर थोरात तर लोदगा गणातून उबाठा गटाच्या पंचफुलाबाई सुधाकर घोडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मतदानानंतर गंगाबाई कोदळीकर थोरात यांना १२ मते, तर पंचफुलाबाई घोडके यांना ६ मते मिळाली. त्यामुळे गंगाबाई कोदळीकर थोरात यांच्या सभापतीपदी निवडीची घोषणा पिठासीन अधिकारी अविनाश कोरके यांनी केली.

उपसभापतीपदासाठी नांदुरगा गणातील भाजपचे अमोल साहेबराव पाटील आणि भादा गणातील काँग्रेसचे किशोर देविदास जंवजाळे यांनी अर्ज दाखल केले होते. झालेल्या मतदानात अमोल पाटील यांना १२ मते तर किशोर जंवजाळे यांना ६ मते मिळाली. त्यामुळे अमोल पाटील यांची उपसभापतीपदी निवड जाहीर करण्यात आली.

निवड प्रक्रियेवेळी तहसीलदार घनश्याम आडसूळ, सचिव तथा गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे तसेच पंचायत समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. पिठासीन अधिकारी अविनाश कोरके, तहसीलदार घनश्याम आडसूळ आणि गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे यांनी नवनिर्वाचित सभापती गंगाबाई कोदळीकर थोरात व उपसभापती अमोल पाटील तसेच सदस्यांचा सत्कार केला.

दरम्यान, औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनीही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पंचायत समितीवर भाजपचा सभापती आणि उपसभापती निवडून आल्याने भाजप कार्यकर्त्यांनी पंचायत समिती परिसरात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT