निलंगा : तालुक्यातील बसपूर पाटी येथे दोन मोटार सायकलचा समोरासमोर अपघात होऊन चारजण गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि ६) दुपारीच्या सुमारास घडली. जखमींना लातूरच्या शासकीय रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
निटूरमोड येथील रहिवासी बालाजी कांबळे व महादु खोंड हे दुचाकी क्रमांक (एम एच.२४ बीपी ४७९६) वरुन उदगीरकडे जात असताना समोरून वलांडीवरुन लातूरकडे जाणारे पी. एन. सौदागर व बी. एल. सौदागर यांच्या दुचाकीचा (क्रमांक एमएच २४ एसी ७०१६) यांचा बसपुर मोडवर समोरासमोर अपघात झाला. अपघातात हे चौघेही गंभीर जखमी झाले. त्याना पुढील उपचारासाठी लातूरच्या शासकीय रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. निटूर चौकीचे बीट अंमलदार शिंदे सुधीर यांनी दोन्ही मोटार सायकली ताब्यात घेतल्या.