

पाथरी (छत्रपती संभाजीनगर) : माजलगाव पाथरी रोडवरील आष्टी फाटा येथे भरधाव आयशर चालकाने ब्रेक लावल्याने झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना दि.२ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.
या अपघातात रमेश अंबादास चव्हाण (वय ३५, रा. पोईतांडा, ता. गेवराई) यांचा जागीच मृत्यू झाला, तर नितीन पवार हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमीला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत अंबादास चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम. एच.२४ ए.यु.८४३५ या क्रमांकाच्या आयशर वाहनाच्या चालकावर पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आयशर वाहन चालकाने आपले वाहन भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून वळणावर अचानक ब्रेक लावल्याने हा अपघात झाला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.