Five feet of water in the ground floor of the tehsil
रेणापूर, पुढारी वृत्तसेवा : तहसील कार्यालयाच्या तळमजल्यात चार ते पाच फूट पाणी साचल्यामुळे तळ मजल्याला अक्षरशः तलावाचे स्वरूप आले आहे. यातील साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी तहसील प्रशासन सतत प्रयत्नशील आहेत परंतु पाणी काही केल्या हाटत नाही. सध्या साडेसात एचपीची मोटार लावून नगर पंचायतचे कर्मचारी पाण्याचा उपसा करीत आहेत.
तहसील कार्यालयाशेजारी न्यायालय, विश्रामगृह, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर कार्यालये आहेत. मागील पावसाने या परिसरात पाणी साचल्याने त्याचा पाझर फुटून तहसील कार्यालयाच्या तळमजल्यात पाणी साचले आहे. हे पाणी बाहेर काढण्यासाठी इंजीनचा वापर केला गेला परंतु पाणी कांही केल्या हाटत नाही.
जेवढे पाणी बाहेर पडते तेवढेच परत साचत आहे. समसापूर व पिंपळफाट्यापासून पावसाचे पाणी रेणा नदीकडे वाहत येते. हे पाणी सरळ नाल्याव्दारे वाहून जात होते. परंतु तहसील समोरची नाली बुजल्यामुळे हे पाणी वाहून जात नाही. तहसील कार्यालयाच्या चोहोबाजूंनी चढ असल्यामुळे अडलेले पाणी झिरपून सरळ तळमजल्यात साचत आहे. साडे सातच्या मोटारीने नगरपंचायतचे कर्मचारी साचलेले पाणी बाहेर काढीत आहेत.