पक्षी छायाचित्र स्पर्धेत धनंजय गुट्टे प्रथम file photo
लातूर

पक्षी छायाचित्र स्पर्धेत धनंजय गुट्टे प्रथम

छत्रपती संभाजीनगर येथे २२ फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत अकरावा ईआरएफईए पक्षी महोत्सव झाला.

पुढारी वृत्तसेवा

Dhananjay Gutte wins first place in bird photography competition

लातूर, पुढारी वृत्तसेवा: छत्रपती संभाजीनगर येथे २२ फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत अकरावा ईआरएफईए पक्षी महोत्सव झाला. यात मराठवाडा पक्षी छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत येथील जिल्हा पोलिस दलातील सहायक पोलिस उपनिरीक्षक व वन्यजीव छायात्रिकार धनंजय गुट्टे यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

त्यांनी जंगली पिंगळा पक्ष्याने प्रेयिंग मॅन्टिस कीटकाची शिकार करून खाताना त्यांच्यातील प्रतिकार करतानाचे छायाचित्र टिपले होते. हे छायाचित्र त्यांनी या स्पर्धेसाठी दिले होते. या छायाचित्राला प्रथम पारितोषिक मिळाले आहे.

यावेळी सुनील लिमये, लाकरा, दिलीप यार्दी, महापौर समीर राजूरकर, रेवती कुलकर्णी, गौरी, सुधाकर कुन्हाडे (पक्षीतज्ज्ञ), वन विभागाचे अधिकारी, संयोजक व निसर्गप्रेमी उपस्थित होते. या यशाबद्दल त्यांचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT