NEET paper leak case : सीबीआयचे पथक पुन्हा लातुरात file photo
लातूर

NEET paper leak case : सीबीआयचे पथक पुन्हा लातुरात

दोन प्राध्यापक रडावर असल्याची चर्चा

पुढारी वृत्तसेवा

CBI team back in Latur

लातूर, पुढारी वृतसेवा : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात १३ मे रोजी तपासासाठी आलेली सबीआयची पथके तब्बल १८ दिवस लातूरमध्ये तळ ठोकून होती. ४ जून रोजी त्यांनी शहर सोडले होते. गरज भासल्यास ते परत येतील, असा लातूरकरांचा अंदाज खरा ठरला असून, १८ जुलै रोजी सीबीआयची दोन पथके लातुरात दाखल झाली आहेत.

रविवारी त्यांनी शहरातील एका नामांकित महाविद्यालयातील दोन प्राध्यापकाची माहिती व त्याचा शोध घेतल्याची चर्चा आहे. त्यापैकी एक सेवानिवृत्त असून दूसरा कार्यरत आहे. त्यांची नेमकी कशाबाबत चौकशी होणार, हे कळू शकले नाही. ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली होती.

या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. तपासादरम्यान या घोटाळ्याचे काही धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्याने १२ मे रोजी सीबीआयचे विशेष पथक शहरात दाखल झाले होते. या काळात सीबीआयने काही व्यक्तींची चौकशी केली. तब्बल १८ दिवसांच्या मुक्कामानंतर ४ जून रोजी पथके परत गेली होती. या प्रकरणाचा विस्तार मोठा असल्याने व तपास अद्याप सुरू आहे.

दरम्यान १८ मे रोजी दोन पथके लातुरात दाखल झाली आहेत. शनिवारी एक पथक आरसीसीच्या कार्यालयात गेले होते, तेथे त्यांनी नेमके काय केले हे कळू शकले नाही. दरम्यान, रविवारी पथक लातूर शहरातील एका महाविद्यालयात प्राध्यापकाचा शोध घेत गेले.

तेथून त्यांनी शहरातील इंडियानगर तसेच अंबाजोगाई रोड परिसरात असलेल्या शारदानगर मधील दोन अर्पार्टमध्ये विचारपूस केल्याचे समजते. ते संबंधित प्राध्यपकाच्या शोधात होते, अशी चर्चा होती. दुसरे पथक उदगीर येथे गेल्याची चर्चा होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT