Caste certificate issued
लातूर : निलंगा येथे गेल्या नऊ दिवसापासून सकल आदिवासी कोळी महादेव समाजाच्या वतीने सुरू असलेल्या अन्नत्याग उपोषण उपविभागीय अधिकाऱ्याकडून मंगळवारी ता. २९ रोजी प्रमाणपत्राचे वाटप केल्यानंतर स्थगित करण्यात आले. जर दीड महिन्यात दाखल केलेले तीन हजार प्रकरणात प्रमाणपत्र वाटप करून निकाली नाही काढल्यास पुन्हा पंधरा सप्टेंबर पासून आंदोलन करू असा इशारा सकल आदिवासी कोळी महादेव समाजाचे नेते चंद्रहास नलमले यांनी दिला.
निलंगा येथील उप विभागीय कार्यालयासमोर सकल आदिवासी कोळी महादेव समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण सुरु केले होते नवव्या दिवशी उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली होती. तालुक्यातून मोठ्या प्रमाणात समाज बांधव कुपोषणाचे ठिकाणी जमा झाला होता.
या अन्नत्याग उपोषणासाठी बसलेले मराठवाडा अध्यक्ष चंद्रहास नलमले यांच्या नेतृत्वाखाली उपोषण कर्ते हरीचंद्र मुडे वय 85, वर्षे रा. भंगार चिंचोली तसेच माधवराव पिटले वय 40 वर्षे रा.अंबुलगा बालाजी औटी वय ४५ रा. बडूर हे चार जण अन्नत्याग उपोषणास बसले होते.
या उपोषण कर्त्याकडून टि.सी, बोनाफाईड व वडिलधाऱ्या नातेवाईकांच्या जात प्रमाणपत्र अंधारे जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अकरा महीन्यापूर्वी दाखल केलेले जातीचे प्रमाणपत्र त्वरित देण्यात यावे, महाराष्ट्र शासनाने १९६६ प्रमाणे ३६ व ३६ अ नोंदणी आदिवासी खातेदार म्हणून कोळी समाजाच्या सातबारावर नोंदणी करावी व त्याआधारे प्रमाणपत्र देण्यात यावे, वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी रक्त नात्याचे परिपत्रक काढावे, अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय प्रमाणे कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, आदिवासी कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे, ढोर कोळी यांचा १९५० पूर्वीचा कोळी जमातीचा पुरावा ग्राह्य धरून जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे यासह आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या होत्या दाखल झालेल्या जात प्रमाणपत्र मध्ये 15 सप्टेंबर पर्यंत सर्व प्रकरणाचा निपटारा करावा अशी मागणी श्री नलमले यांनी केली. त्रुटी मध्ये काढलेल्या प्रकरणातील संचिकेची पूर्तता केल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांचे वाटप आंदोलन स्थळी करण्यात आले.
या उपोषण स्थळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अरविंद पाटील नगर यांनी पाठिंबा देऊन उपोषण स्थळी कांही जातीच्या प्रमाणपत्राचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले व यावेळी बोलताना अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले की, शासन स्तरावर असलेल्या मागण्यासाठी तात्काळ निर्णय लावून महसूल मंत्र्यांना शासन परिपत्रक काढण्यास भाग पाडू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली शिवाय मराठवाड्यातील गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रलंबित असलेला हा प्रश्न आता पण मार्गी लावू अशी आश्वासन उपोषणकर्त्यांना व समाज बांधवांना दिले. त्यांच्या हस्ते चंद्रहास नलमले यांचे ज्यूस देऊन उपोषण सोडण्यात आले