Blood samples of 60 horses sent from Latur district
लातूर, पुढारी वृतसेवा : लातूर येथे ग्लैंडर्समुळे झालेला एक घोड्याचा मृत्यू तसेच आढळलेले चार संशयित घोडे या पार्श्वभूमीवर लातूरच्या पशुवैद्यकीय विभागाने खबरदारी म्हणून जिल्ह्यातील ६० घोड्यांचे रक्तजलनमुने पुणे येथील पशुरोग अन्-वेषन प्रयोगशाळेत तपासणीसाठी गुरुवारी (दि.१९) पाठवल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी दिली.
ग्लैंडर्सच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अश्वमालकांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला होता. अश्वमालकांची तपासणीसाठीची मागणी व खबरदारी म्हणून रक्तजल नमुने पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील १३१ पशुवैद्यकीय दवाखान्यांतील पशुवैद्यकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील घोड्यांचे रक्तजलनमुने घेतले व ते लातूर येथे संकलित करून पुणे येथील प्रयोगश- शाळेत पाठविण्यात आले.
तिथे त्याची तपासणी होईल त्यात संशयित आढळले तर ते रक्तजल नमुने पुढे हरियाणा येथील राष्ट्रीय अश्वसंशोधन केंद्राच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. ग्लैंडर्सची लागण झालेल्या तसेच संशयित अश्वांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींची जिल्हा परिषद आरोग्य विभागातील डॉक्टरांनी तपासणी केली आहे. त्यांच्यात कोणातीही लक्षणे आढळली नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी सांगितल्याचे उपायुक्त डॉ. शिंदे यांनी सांगितले.