Atul Save : “विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही file photo
लातूर

Atul Save : “विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही

मंत्री अतुल सावे यांची ग्वाही, फर्दापूर जि.प. सर्कलमध्ये ८ कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

पुढारी वृत्तसेवा

Atul Save: "We will not let a lack of funds hinder development works."

फर्दापूर, पुढारी वृत्तसेवा: फर्दापूर जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही. भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ईद्रीस मुलतानी यांनी संत सेवालाल महाराज स्मारक व पुतळ्याची मागणी केली होती. तांडा वस्ती सुधार योजनेतून या कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करीत असल्याची घोषणा बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केली. शनिवारी (दि. २२) सायंकाळी फर्दापूर भाजपा कार्यालयाचे उद्घाटन, तसेच फर्दापूर जिल्हा परिषद सर्कलमधील सुमारे आठ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या शुभारंभानंतर रा. येथील मुख्य चौकात आयोजित जाहीर समेत ते बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.

ईद्रीस मुलतानी यांच्या प्रयत्नातून फर्दापूर जिल्हा परिषद सर्कलमध्ये आठ कोटी रुपयांच्या निधीतून फर्दापूर-सावळदबारा ३३ के. व्ही. वीजवाहिनी, सर्कलमधील ७७ विद्युत रोहित्र बसविणे, फर्दापूर पाणीपुरवठा योजना दुरुस्ती, राममंदिर सिमेंट रस्ता व भूमिगत गटार, दलित व आदिवासी वस्त्यांमध्ये सामाजिक सभागृह आदी कामांना मंजुरी मिळाली आहे. या कामांचा शुभारंभ अतुल सावे व रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी आमदार सुहास शिरसाठ, जिल्हाध्यक्ष अविनाश गलांडे, उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल, सचिन गरड, बालाजी सोनटक्के, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, जि. प. सदस्य माहीन मुलतानी, पुष्पाताई काळे, अनिताताई मोठे, सुरेश बनकर, सुनील मिरकर, अनिता बनकर, ज्ञानेश्वर मोठे, भगवान आहेर, राधाकृष्ण काकडे, सुनील जाधव, समाधान बावस्कर शिवाजी बूढाळ, जयप्रकाश चव्हाण, गणेश लोखंडे, संजीवन सोनवणे,

सभापती उत्तम चव्हाण, शेख निसार, अजिजखा हमीदखा पठाण, जगन्नाथ गव्हांडे, योगेश शिंदे, शेख इस्माईल, संतोष शिंदे, विकास आगळे, कृष्णा शिरसाठ, जीवन कोलते, गुलाबराव कोलते, सीताराम जाधव, संभाजी पवार, अण्णा तांगडे, शांताराम खराटे, शेख शफीक, भगवान जाधव, फिरोज तडवी, माजीद तडवी उपस्थित होते.

मुलतानींच्या पाठीशी : दानवे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही फर्दापूरच्या विकासासाठी ईद्रीस मुलतानी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.

२५ वर्षात जे जमले नाही ते सहा महिन्यांत केले

सभेत बोलताना ईद्रीस मुलतानी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. जिल्ह्याचे राजकारण वेगळे असून, फर्दापूरचे राजकारण त्याहून वेगळे आहे. माझ्याविरोधात अनेक अफवा पसरविण्यात आल्या; मात्र विरोधकांना २५ वर्षांत जे करता आले नाही, ते आम्ही अवघ्या सहा महिन्यांत करून दाखविले, असा दावा त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT