कॉपर केबल चोरीचा प्रयत्न उधळला; चारजण ताब्यात file photo
लातूर

कॉपर केबल चोरीचा प्रयत्न उधळला; चारजण ताब्यात

गुळमार्केट ते गांधी चौक मार्गावर भूमिगत बीएसएनएल कॉपर केबल चोरीचा प्रयत्न गांधी चौक पोलिसांनी उधळून लावला.

पुढारी वृत्तसेवा

Attempt to Steal Copper Cables; Four Detained

लातूर, पुढारी वृतसेवाः गुळमार्केट ते गांधी चौक मार्गावर भूमिगत बीएसए नएल कॉपर केबल चोरीचा प्रयत्न गांधी चौक पोलिसांनी उधळून लावला. या प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. १० एप्रिल रोजी मध्यरात्री सुमारे १२.२० वाजता एका हार्डवेअर दुकानासमोर जमिनीतून गेलेल्या बीएसएनएल केवलची हाताने खोदकाम करून चोरी करण्याचा प्रयत्न सुरू होता.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना पकडले. साईराम सुब्बाराव (वय २५, रा. एलुरु, आंध्रप्रदेश) याच्यासह तीन महिलांनी संगनमत करून कोणतेही यांत्रिक साधन न वापरता केबल काढण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी बीएसएनएलचे ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर सुहास रामलिंग स्वामी यांच्या तक्रारीवरून गांधी चौक पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेत कोणतीही केबल चोरीला गेली नसून पोलिसांच्या वेळेवर कारवाईमुळे मोठे नुकसान टळले. पुढील तपास पोलीस हवालदार नराळे करत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अंमलदार राम गवारे, रविसन जाधव, सचिन चंद्रपाटले व नागनाथ नराळे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT