An operator died after getting trapped in a harvester in the Zhari area
निलंगा, पुढारी वृत्तसेवाः हार्वेस्टरने तुरीची रास करून मशीन साफ करत असताना ऑपरेटरचा मशीनमध्ये अडकून मृत्यू झाल्याची झाला.
झरी (ता. निलंगा) शिवारात २ जानेवारी रोजी ही घना घडली आहे. सचिन राजकुमार धिम्मान (वय २८, रा. बिरालसी ता. जि. मुज्जफर नगर उत्तरप्रदेश) असे मयताचे नाव आहे. झरी शेत शिवरातील गट क्रमांक १६५ मधील शेतातील तूर काढण्यासाठी हार्वेस्टर मशीन घेऊन ऑपरेटर सचिन राजकुमार धिम्मान आले.
त्यानंतर रास करून ऑपरेटर हा मशीन साफ सफाई करीत असताना तो मशीनमध्ये अडकला व मरण पावला. या प्रकरणी सदरेल घटनेची माहिती घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी निलंगा पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळ पंचनामा केला.