Latur News : विसर्जन मिरवणुकीत पोलिसांशी हुज्जत; भाजप तालुकाध्यक्षासह १४ जणांवर गुन्हा file photo
लातूर

Latur News : विसर्जन मिरवणुकीत पोलिसांशी हुज्जत; भाजप तालुकाध्यक्षासह १४ जणांवर गुन्हा

लातूर-उदगीर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे. ही घटना २२ सप्टेंबरच्या रात्री डिगोळ येथे घडली.

पुढारी वृत्तसेवा

Altercation with police during immersion procession; case registered against 14 people, including BJP Taluka President

शिरूर अनंतपाळ, पुढारी वृत्तसेवा: गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे बंद करून विसर्जनाची कार्यवाही वेळेत पूर्ण करण्याच्या पोलिसांच्या सूचनेवरून वाद घालत पोलिसांशी हुज्जत, धक्काबुक्की व अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपचे शिरुर अनंतपाळ तालुकाध्यक्ष माधव भाउसाहेब बिरादार यांच्यासह १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर लातूर-उदगीर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे. ही घटना २२ सप्टेंबरच्या रात्री डिगोळ येथे घडली.

डिगोळ येथील शंभू महादेव गणेश मंडळाच्या मिरवणुकीसाठी पोलिस व होमगार्डचा बंदोबस्त तैनात होता. रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे सुरू असून विसर्जनास विनाकारण विलंब होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानंतर परिविक्षाधीन उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी अक्षय जाधव हे पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी डीजे बंद करून विसर्जनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, सूचनांकडे दुर्लक्ष करून पोलिसांशी वाद घालण्यात आला. माधव बिरादार, मंडळाचे अध्यक्ष रामेश्वर डिगोळे, उपाध्यक्ष मंगेश दासरे यांच्यासह सुदर्शन डिगोळे, गोविंद दासरे, संदीप टाकळगावे, किरणबिरादार, नवाज मुजेवार, शुभम बिरादार, सुधाकर शिंगरुपे बाळू लोंढे,

सतीश कलमे, सचिन वडजे आणि अमोल शेळवे यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरो आहे. दरम्यान, माधव बिरादार यांनी महिलांसह जमावाल महामार्गावर बोलावून रस्ता रोको केल्याचे फिर्यादीत नमू आहे. पोलिसांनी वारंवार रस्ता मोकळा करण्याच्या सूचन करूनही जमावाने प्रतिसाद दिला नाही. पोलिस वाहनालाह अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे. पोलीस अंमलदा विनय उबाळे यांच्या फिर्यादीवरून संबंधित १४ जणांस अन्य १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शिरूर अनंतपाळ पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT