लातूरच्या आदर्श कॉलनीत वेश्या व्यवसायावर धाड file photo
लातूर

लातूरच्या आदर्श कॉलनीत वेश्या व्यवसायावर धाड

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

A raid was conducted on a prostitution ring in Adarsh ​​Colony, Latur

लातूर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील आदर्श कॉलनी परिसरात सुरु असलेल्या अनैतिक वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने ३० जानेव-ारी रोजी धाड टाकून एका महिला आरोपीस ताब्यात घेतले तर ४ पीडित महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर शहरातील आदर्श कॉलनी येथील आदर्श सदनिका "सी" विंग, सातवा मजला, फ्लॅट क्रमांक ७०२ येथे एक महिला भाड्याने राहून लातूर शहर व परिसरातील महिलांना आर्थिक आमिष दाखवून त्या ठिकाणी बोलावून घेत होती व त्यांच्याकडून अनैतिक वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षास प्राप्त झाली होती.

सदर माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलीस पथकाने बनावट ग्राहकास सदर ठिकाणी पाठवून खात्री करून घेतल्यानंतर, बनावट ग्राहकाच्या ठरलेल्या इशाऱ्यावरून पोलीस पथकाने सदर फ्लॅटवर अचानक छापा टाकला.

छाप्यादरम्यान फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय चालविणारी महिला आरोपी तसेच वेश्या व्यवसायासाठी बोलावून घेतलेल्या ४ पीडित महिला आढळून आल्या. तात्काळ कारवाई करत आर- ोपी महिलेस ताब्यात घेण्यात आले व पीडित महिलांची सुरक्षित सुटका करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT