Latur News : १०० फुटांचा रोड होतोय ३३ फुटांत; राज्य रस्ते विकास मंडळाचा अजब कारभार File Photo
लातूर

Latur News : १०० फुटांचा रोड होतोय ३३ फुटांत; राज्य रस्ते विकास मंडळाचा अजब कारभार

शहरातून जात असलेला शिरूर अनंतपाळ - देवणी गुरनाळ हा रोड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून बनविण्यात येत आहे.

पुढारी वृत्तसेवा

A 100-foot road is being made into 33 feet; Strange management of the State Road Development Board

देवणी, पुढारी वृत्तसेवा : शहरातून जात असलेला शिरूर अनंतपाळ - देवणी गुरनाळ हा रोड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून बनविण्यात येत आहे. मुख्यतः हा रस्ता तळेगाव- नेकनाळ देवणी हा १०० फूट रुंदीचा आहे मात्र ३३ फुटाचा होत असल्याने प्रशासनाचा हा अजब कारभार असल्याची चर्चा शहरासह तालुक्यात आहे. शहरातील हा मोठ्या वर्दळीचा रोड असल्याने हा रोड ३३ फुटा ऐवजी मोठा करावा अशी मागणी नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून टेंभुर्णी- लातूर - शिरूर अनंतपळ देवणी गुरनाळ हा रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरणासाठी रस्ते विकास महामंडळाकडून बनविण्यात येत आहे. हा रोड देवणी शहरातून कुंभार गल्ली- पुण्यश्लोक अहिल्या होळकर नगर पोलीस स्टेशन एम एस ई बी-लासोना चौक या प्रमुख वर्दळीच्या ठिकाणाहून जात आहे.

हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येत असून हा रोड १०० फुटांचा असला तरी रस्ते विकास महामंडळाकडून हा रस्ता केवळ ३३ फुटाचा बनविण्यात येत आहे. त्या रोडच्या दोन्ही बाजूस १ मीटरची नाली व १ मीटरचा शोल्डर बनविण्यात येत असल्याने हा रोड मध्यभागी घेऊन उर्वरित रोडची जागा नालीच्या दोन्ही बाजूस शिल्लक राहत आहे.

यामुळे नालीचे बांधकाम रोडच्या दोन्ही बाजूच्या टोकास म्हणजेच शंभर फूट हद्द करून त्या शेवटच्या टोकास नालीचे बांधकाम करावे. जेणेकरून रोड मोठा होईल व त्या रोडवरती नागरिकांचे अतिक्रमण ही होणार नाही. उर्वरित रोडचे काम अंदाजपत्रकाप्रमाणेच करावे अशी मागणी नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. १०० फूट रोडच्या दोन्ही टोकास नाली बांधकाम करावे व उर्वरित रोडचे काम करावे.

तळेगाव - नेकनाळ - देवणी हा राज्यमार्गाचा दर्जा असल्याने हा रोड १०० फुटांचा आहे. सध्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून होत असलेल्या रोडचे काम रोड नाली व शोल्डर हे सर्व मिळून ४५ फुटांमध्येच बनवत आहेत. उर्वरित ५५ फुटांवर रोड शिल्लक राहत आहे. या ५५ फुटांवर नागरिकांचे अतिक्रमण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. सदरील रस्त्यावर पोलिस स्टेशन, शाळा, महाविद्यालय, महावितरण कार्यालय, गोडावून असे शासकीय व निमशासकीय कार्यालय असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुक, नागरिक व शाळकरी मुलांचे वर्दळ आहे. त्याकरिता हा रोड मोठे होणे गरजेचे आहे. या १०० फुटाच्या रोडच्या हद्द कायम करून रोडच्या दोन्ही टोकास नालीचे बांधकाम करून उर्वरित रोड व शोल्डरचे काम करावे जेणेकरून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही.
-डॉ. कीर्तीताई संजय घोरपडे नगराध्यक्षा नगरपंचायत, देवणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT