64th Maharashtra State Amateur Marathi Drama Competition in full swing
लातूर, पुढारी वृतसेवा : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत लातूर केंद्रातून सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान, लातूर या संस्थेच्या दास्ताँ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या नाटकाची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.
१७ ते ३० नोव्हेंबर, २०२५ या कालावधीत स्व. दगडोजीराव देशमुख सभागृह, लातूर येथे अतिशय जल्ल ोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण ११ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे लातूर केंद्रावरील अन्य निकाल असे आहेत. कलारंग, लातूर या संस्थेच्या टेडी बिअर या नाटकास द्वितीय पारितोषिक तसेच सुर्योदय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, लातूर या संस्थेच्या उन्हातलं चांदणं या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.
दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक महेश सबनीस (नाटक- दास्ताँ), द्वितीय पारितोषिक संजय अयाचित (नाटक टेडी बिअर), तृतीय पारितोषिक अॅड. शैलेशगोजमगुंडे (नाटक-उन्हातलं चांदणं) प्रकाश योजना प्रथम पारितोषिक कृतार्थ कंसारा (नाटक उन्हालं चांदणं), द्वितीय पारितोषिक कल्याण वाघमारे (नाटक टेडी बिअर), तृतीय पारितोषिक प्रा. जितेन्द्र बनसोडे (नाटक घाट) नेपथ्य प्रथम पारितोषिक वाय. डी. कुलकर्णी (नाटक टेडी बिअर) द्वितीय पारितोषिक बालाजी म्हेत्रे (नाटक उन्हातलं चांदणं), तृतीय पारितोषिक पार्थ माने (नाटक-विठ्ठला) रंगभूषा :प्रथम पारितोषिक भारता थोरात (नाटक-इथे ओशाळला मृत्यू), द्वितीय पारितोषिक अमृता गलांडे (नाटक विठ्ठला) तृतीय पारितोषिक स्मिता अयाचित (नाटक टेडी बिअर) संगीत दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक किरण जोशी (नाटक-टेडी बिअर), द्वितीय पारितोषिक नवनाथ सुगावकर (नाटक विठ्ठला) तृतीय पारितोषिक आनंद सरवदे (नाटक-घाट) वेशभूषाः प्रथम पारितोषिक योगेश पोटभरे (नाटक इथे ओश ाळला मृत्यू), द्वितीय पारितोषिक सुमित हसाळे (नाटक विठ्ठला) तृतीय पारितोषिक सचिन उपाध्ये (नाटक-उन्हातलं चांदणं) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक अमृत महाजन (नाटक-दास्ताँ) व ईश्वरी वाघमारे (नाटक-टेडी बिअर), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे सुधन्वा पत्की (नाटक-टेडी बिअर)
, प्रा. ज्योतिबा बडे (नाटक-इथे ओशाळला मृत्यू), अॅड. शैलेश गोजमगुंडे (नाटक-उन्हातलं चांदणं), प्रमोद कांबळे (नाटक-विठ्ठला), चैताली बडे (नाटक-उन्हातलं चांदणं), कल्पना महाजन (देशपांडे) (नाटक दास्ताँ), श्रुती सोनवणे (नाटक-विठ्ठला), अपर्णा गोवंडे (कुलकर्णी) (नाटक-अंतरछिद्र द ब्लॅक होल) स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून चंद्रशेखर गोखले, विवेक खेर आणि अंजली पटवर्धन यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या नाटकांच्या संघांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले.