मराठवाडा

खरीप हंगामातील पिकास पावसामुळे पुन्हा जीवदान; १५ दिवसापासून मारली होती दांडी

अमृता चौगुले

जवळाबाजार (हिंगोली), पुढरी वृत्‍तसेवा : हिंगोली जिल्‍हात गेल्‍या मागील पंधरा दिवसानंतर रिमझिम पाऊस खरीप हंगामातील पिकास उपयुक्त ठरत आहे. परिसरातील खरीप हंगामातील पिकाच्या वाढसाठी पावसाची गरज होती. परंतु पिकास योग्य असा पाऊस पडला नव्हता. तसेच गेल्‍या पंधरा दिवसात पावसाने दांडी मारली हाेती यामूळे पावसाअभावी पिके धोक्यात आली होती.

शुक्रवारी सायंकाळपासून ढगाळ वातावरण व रिमझिम पावसाला सुरूवात झाली आहे. शनिवार सकाळपासून हलका ते मध्यम स्वरूपातील पाऊस पडत आहे. पण सध्याच्या परिस्थितीत खरीप हंगामातील पिकास माेठया पावसाची प्रतिक्षा आहे. परंतु खरीप हंगामातील पिकास रिमझिम पावसाने जीवदान मिळाले आहे.

पावसाअभावी जनावरांना चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून रब्बी हंगामातील पिकासाठी सुध्दा पावसाची गरज आहे. तसेच धरणात मुबलक पाणी साठा नाही.  १७ ऑगस्टपासून पावसाचा ६ व्या नक्षत्रास सुरुवात झाली असून  पावसाळ्याचे जवळपास अडीच महिने पुर्ण झाले असून मागील दोन दिवसापासून रिमझिम पावसाला सुरूवात झाली आहे.  परंतु शेतकरी जोरदार पावसाची वाट पाहत आहेत.

-हेही वाचा 

SCROLL FOR NEXT