मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर : दोन बायका, पाच अपत्य तरीही कराटे शिक्षकाचा तरुणीसोबत घरोबा, बलात्काराचा गुन्हा नोंद

backup backup

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कराटे शिक्षकाने २२ वर्षीय तरुणीसोबत जवळीक साधत तिच्यावर बलात्कर करुन घरोबा केला. आधीच्या दोन बायका, पाच अपत्य असताना त्याने बायको जळून मृत झाल्याचे सांगून, तसेच कोणतेही अपत्य नाही, असे सांगून तरुणीशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. यानंतर तो दोन वर्षे तरुणीसोबत राहिला. यादरम्यान तिचा दोनवेळा गर्भभात केला. यानंतर तिला घरातून हाकलून दिले. या प्रकरणी १|ऑगस्ट रोजी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिलिंद शिवाजी घोरपडे (वय ५०, रा. आशानगर, गारखेडा परिसर) असे आरोपीचे नाव आहे. पुंडलिकनगर पोलिसांनी त्याला अटक केली असून ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

२२ वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, नोव्हेंबर २०२१ मध्ये तिने मिलिंद घोरपडे याच्याकडे कराटे क्लास लावला होता. काही दिवसांनंतर घोरपडेने तिला क्लासचे मॉनिटर केले. ती तेथे येणाऱ्या मुला-मुलींना कराटे शिकवू लागली. यातून तिची घोरपडेसोबत जवळीक वाढली. घोरपडे घरी एकटाच असायचा. तो पीडितेला घरी बोलून घ्यायचा. तेथेच त्याने तरुणीवर बळजबरी अत्याचार केला. जवळीक वाढल्यावर माझी पहिली पत्नी जळून मृत झाली आहे. मला मुलबाळ नाही, असे मिलिंद घोरपडे तरुणीला सांगायचा. तसेच, आपण लग्न करू, मी तुझा सांभाळ करतो, असे आमिष त्याने दाखविले. त्यानंतर तिच्यावर वारंवार अत्याचार केले.

आधी नोकरीचे बघू म्हणत गर्भपात

तरुणीसोबत राहून मिलिंद घोरपडेने वारंवर तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. त्यातून २०२२ मध्ये तरुणी गर्भवती राहिली. तेव्हा त्याने तिला आधी नोकरीचे बघू म्हणत तिला बाळ नको म्हणून गर्भपात करण्यास भाग पाडले. निर्मल हॉस्पिटल, शिवाजीनगर येथे नेऊन तिचा गर्भपात केला. दरम्यान, पीडिता पुन्हा गर्भवती राहिली. २७ जुलै २०२३ रोजी घोरपडेने तरुणीला पुन्हा त्याच हॉस्पिटलमध्ये नेऊन गर्भपात करायला भाग पाडले. त्यानंतर दुसऱ्या पत्नीला हाताशी धरून तिला हाकलून दिले.

तरुणीला हाकलले अन् दुसऱ्या पत्नीला आणले

आरोपी मिलिंद घोरपडे याची पहिली पत्नी माहेरी राहते. तिला दोन मुली, एक मुलगा आहे. एका मुलीचे लग्न झाले असून तिला एक मुलगाही आहे. दुसरी पत्नी आधी दुसरीकडे राहत होती. तिला एक मुलगा, एक मुलगी आहे. आशानगरमधील घरातून तरुणीला बाहेर काढल्यानंतर दुसरी पत्नी तेथे राहायला आली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक आनंद बनसोडे करीत आहेत.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT