Jalna Political News : जिल्हा परिषद, पं. स. आरक्षण जाहीर, जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत File Photo
जालना

Jalna Political News : जिल्हा परिषद, पं. स. आरक्षण जाहीर, जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत

गावा-गावांत चढणार राजकीय ज्वर, इच्छुकांत आशा निराशा

पुढारी वृत्तसेवा

Zilla Parishad, Panchyat samiti. Reservation announced, released at the District Collector's Office

जालना, पुढारी वृत्तसेवा: जालना जिल्हा परिषदेसाठी गटनिहाय आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात काढण्यात आली. जिल्हा परिषदेचे वालुकानिहाय गटामध्ये आरक्षण निश्चित करण्यात आले. यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग १५, सर्वसाधारण ३३, अनुसूचित जाती ८, अनुसूचित जमाती १ असे गटनिहाय आरक्षण निश्चित झाले. पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी देखील आरक्षण सोडत पार पडली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) नम्रता चाटे, नायब तहसिलदार तुषार निकम यांच्यासह जिल्ह्यातील ग्रामस्थांची उपस्थित होते. जिल्हा परिषद व पंचायत समीती आरक्षणाच्या सोडतीनंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना आगामी काही दिवसात वेग येणार असल्याचे चित्र पहावयास मिळणार आहे. इच्छुक विविध राजकीय पक्षांकडे उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी करणार असल्याने गावा-गावातील राजकीय वातावरण ढवळून निघणार असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषद व पंचायत समीती निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र येउन लढविणार कि स्वतंत्र लढणार हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. आर क्षणानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर हसू तर काहींच्या चेह-यावर निराशा दिसून आली.

तालुक्यात झालेले आरक्षण असे भोकरदन तालुक्यातील गट वालसावंगी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), पारध बु. नागरिकांचा मागास प्रवर्ग, जळगाव सपकाळ अनुसूचित जमाती (महिला), आन्वा सर्वसाधारण (महिला), बालसा बडळा सर्वसाधारण, आव्हाना नागरिकांचा मागास प्रवर्ग, सोयगाव देवी सर्वसाधारण (महिला), नळणी बु. सर्वसाधारण, हसनाबाद नागरिकांचा मागास प्रवर्ग, चांदई ठोंबरी सर्वसाधरण (महिला), राजूर अनुसूचित जाती (महिला).

जाफराबाद तालुक्यातील गट वरूड बू नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), माहोरा नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), जबखेडा ठेंग अनुसूचित जाती (महिला), सिपोरा अंभोरा अनुसूचित जाती (महिला), टेंभुर्णी नागरिकांचा मागास प्रवर्ग, अकोला देव नागरिकांचा मागास प्रवर्ग.

बदनापूर तालुक्यातील गट दाभाडी - सर्वसाधारण (महिला), बावणे पांगरी अनुसूचित जाती, गेवराई बाजार नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), शेलगाव अनुसूचित जाती, रोषनगाव सर्वसाधारण (महिला). जालना तालुक्यातील गट वाघुळ जहाँगीर अनुसूचित जाती, पौरकल्याण सर्वसाधारण (महिला), मोजपूरी सर्वसाध ारण, शेवली अनुसूचित जाती, नेर सर्वसाधारण, रामनगर सर्वसाधारण (महिला), देवमुर्ती नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), रेवगाव अनुसूचित जाती (महिला), भाटेपूरी सर्वसाधारण.

मंठा तालुक्यातील गट : तळणी सर्वसाधारण, खोराड सावंगी सर्वसाधारण, जयपूर सर्वसाधारण, हेलस सर्वसाधारण, पांगरी गोसावी सर्वसाधारण (महिला), केंधळी नागरिकांचा मागास प्रवर्ग.

परतूर तालुक्यातील गटः वाटूर सर्वसाधारण, सातोना खुर्द सर्वसाधारण (महिला), पाटोदा माव नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), आष्टी सर्वसाधारण (महिला), कोकाटे हदगाव सर्वसाधारण (महिला),

घनसावंगी तालुक्यातील गटः राणीउंचेगाव सर्वसाधारण, रांजणी सर्वसाधारण, गुरुपिंपरी सर्वसाधारण, मच्छिंद्रनाथ चिंचोली सर्वसाधारण, कुंभारपिंपळगाव सर्वसाधारण (महिला), अंतरवाली टेंभी सर्वसाधारण (महिला), राजाटाकळी सर्वसाधारण (महिला)

अंबड तालुक्यातील गट: रोहिलागड नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), पारनेर सर्वसाधारण (महिला), जामखेड नागरिकांचा मागास प्रवर्ग, ताडहादगाव सर्वसाधारण, धाकलगाव सर्वसाधारण (महिला), साष्टपिंपळगाव सर्वसाधारण, गोंदी सर्वसाधारण, शहागड सर्वसाध ारणसाठी आरक्षित झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT