Jalna News : ज्ञान मंदिराला लोकसहभागाचे पाठबळ, पालकांसह शिक्षकवृंदांनी बदलले शाळेचे रूपडे  File Photo
जालना

Jalna News : ज्ञान मंदिराला लोकसहभागाचे पाठबळ, पालकांसह शिक्षकवृंदांनी बदलले शाळेचे रूपडे

पिंपळगाव रेणुकाई येथे जिल्हा परिषदेची केंद्रीय प्राथमिक शाळा आहे.

पुढारी वृत्तसेवा

Zilla Parishad Central Primary School at Pimpalgaon Renukai

पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : एकीकडे इंग्रजी शाळांची संस्कृती वाढत चाललेली असताना दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांची खस्ता हालात सुरू आहे. जिल्हाभरातील बहुतांश शाळा गळक्या, खिडक्या तुटलेल्या, दरवाजे मोडलेले, पुरेशे मैदान नाही, बसण्यासाठी विद्यार्थ्यांना बाकड्याची सोय नाही अशा नानाविध समस्यांशी झुंज देत आहेत.

मात्र, गोरगरिबांच्या अनेक पिढ्या उज्ज्वल करणाऱ्या या ज्ञान मंदिरांनाही झळाळी मिळावी, यासाठी पिंपळगाव रेणुकाई गावातील - पालकांनी एकत्र येत लोकसहभागाचे भक्कम पाठबळ देण्यासाठी पुढाकार घेतला. येथील जिल्हा परिषद शाळेचे पाहता पाहता रूपडे बदलले. या बाबीला पूर्ण करून घेण्यासाठी केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप देशमुख निमित्त मात्र ठरले.

दरम्यान, पिंपळगाव रेणुकाई येथे जिल्हा परिषदेची केंद्रीय प्राथमिक शाळा आहे. इयत्ता सावतीपर्यंत ही शाळा असून सुमारे २६८ मुले येथे ज्ञानार्जन करतात. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी पालकवर्ग नेहमी आग्रही असतो. यातून शाळांच्या भिंती बोलू लागल्या. आपसातील मतभेद विसरून विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी अजून चांगले काही करता येईल का, हा विचार मनात घेऊन शाळा व्यवस्थापन समितीची निवड बिनविरोध केली. या समितीती उच्चशिक्षित पालकांना स्थान देण्यात आले.

यातून आपली जिल्हा परिषदेची शाळा अजून आकर्षक चांगली कशी दिसेल यावर विचार मंथन झाले. सर्वांच्या सहकार्याने वर्ग खोल्यांची रंगरंगोटी करण्यात आली. सर्व सदस्यांनी स्वयं प्रेरणेने आपला आर्थिक हातभार लावला. यात शिक्षकांनी मोलाचा वाटा उचलला. शाळेसाठी साउंड सिस्टीम घेण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणे सोपे झाले.

विद्यार्थ्यांत पर्यावरणाची काळजी निर्माण व्हावी यासाठी शाळा परिसरात ५९ विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. व्यासपीठाबरोबरच शाळेच्या भिती बोलक्या केल्या. पोषण आहाराचा तांदूळ ठेवण्यासाठी १० क्विंटलची कोठी खरेदी केली गेली. शाळेच्या भौतिक सुधारणा करण्यासाठी दररोज पाच मिनिटांची सहविचार सभा घेण्यात येतात. यातून शाळेतील विविध समस्यांवर विचार मंथन होउन शाळेच्या शाश्वत विकासाकडे सकारात्म दृष्टीने पाहिल्या जाते. यासाठी मुख्याध्यापक प्रदीप देशमुख कटाक्षाने लक्ष घालतात.

शिक्षकवृंदांकडून १ दिवस श्रमदान

आपला परिसर स्वच्छ राहावा, यासाठी शाळेतील शिक्षकांकडून आठवड्यातून श्रमदान करण्यात येते. यामुळे विद्यार्थ्यांनाही श्रमदानाची सवय लागत आहे. त्यांच्यात श्रम संस्कार आपोआपच होत असल्याचे या उपक्रमातून दिसून येत आहे. शाळेच्या माध्यमातून विद्यार्थिनींना सुरक्षेचे धडे दिल्या जाते. शाळेत त्रयस्थ व्यक्तीची नोंद घेण्यासाठी नोंदणीची सोय करण्यात आली आहे.मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शाळेच्या वतीने पालकांच्या मदतीने प्रयत्न केले जात आहेत. पालकांना बोलावून त्यांचे विचार ऐकूण घेतले जातात. यामुळे पालकवर्गात देखील सकारात्मकता दिसून येत आहे. जिल्हा परिषद शाळेच्या विकासासाठी प्रत्येक पालकांनी फुल नाही पण फुलाची पाकळीची मदत करावी.

-प्रदीप नरवडे, पालक.

शाळेच्या विकासासाठी शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षकांची मोलाची साथ आहे. सर्व गावकरी आणि माझ्या सर्व सहकारी आम्हाला आपली शाळा जिल्ह्याचे आकर्षण बिंद बनवायची आहे. आता आम्ही सुरूवात केली आहे.
प्रदीप देशमुख, मुख्याध्यापक
मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शाळेच्या वतीने पालकांच्या मदतीने प्रयत्न केले जात आहेत. पालकांना बोलावून त्यांचे विचार ऐकूण घेतले जातात. यामुळे पालकवर्गात देखील सकारात्मकता दिसून येत आहे. जिल्हा परिषद शाळेच्या विकासासाठी प्रत्येक पालकांनी फुल नाही पण फुलाची पाकळीची मदत करावी.
-प्रदीप नरवडे, पालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT