जालना : जालना जिल्ह्यातील प्रवासी वाहतुकीची मोठी जबाबदारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) ताफ्यातील 167 बसेसवर आहे. या बसेसच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील हजारो नागरिक रोजंदारीसाठी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रवासाची सोय उपलब्ध होते. मात्र, येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तब्बल 125 बसेस कोकण विभागासाठी रवाना करण्यात आल्याने स्थानिक प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे.
जालना विभागात एकूण 292 बसेच आहेत. गणेशोत्सव हा कोकण विभागातील लोकांचा सर्वात मोठा सण मानला जातो. कोकणातील गावे, शहरांमध्ये मोठ्या संख्येने लोक कामानिमित्त मुंबईत वास्तव्यास असतात. या सर्वांना घरी परतण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ दरवर्षी विशेष बससेवा सुरू करते. त्याच परंपरेनुसार यंदाही जालना जिल्ह्यातील 125 बसेस कोकणासाठी सोडण्यात आल्या आहेत.
यामुळे जिल्ह्यात फक्त 167 बसेस प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध राहणार आहेत. दररोज शेकडो प्रवासी कामधंद्यांसाठी, शिक्षणासाठी आणि ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी एस.टी.वर अवलंबून असतात. मात्र, बस संख्येत झालेली ही मोठी कपात प्रवाशांना लांब प्रतीक्षा, गर्दी आणि वेळेवर गंतव्यस्थानावर न पोहोचण्याचे संकट निर्माण करणार आहे.
परिवहन विभागाने जिल्ह्यातील उपलब्ध बससेवांचा योग्य तो ताळमेळ साधावा, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून होत आहे. काही प्रवाशांनी खासगी वाहनांचा आधार घेण्यास सुरुवात केली असली तरी भाड्याच्या दरामुळे सामान्य नागरिकांवर आर्थिक ताण पडत आहे.