Youths entered the house and attacked with sticks
जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरात गाडीचा कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन टोळक्याकडुन तीन तरुणांवर लाठ्या-काठ्यांनी प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना भोकरदन नाका परिसरातील पोलिस चौकीजवळ घडली. या प्रकरणात एक जण गंभीर जखमी झाला असुन इतर दोन जण जखमी आहेत. मुख्य रस्त्यावर झालेल्या या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जालना शहरात गाडीला कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन १० ते १५ जणांच्या टोळक्याने भोकरदन नारका परिसरात तिघा भावंडावर दगडे, लाठ्या काठ्यांनी अमानुष व प्राणघातक हल्ला चढविल्याची घटना पोलीस चौकीसमोर घडली.
दरम्यान तिघा भावंडापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संदीप भारती यांनी रुग्णालयात पोहचुन जख्मीची विचारपुस केली.
दरम्यान हल्ला करणाऱ्या तिघा संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे..