Yellow alert : जालना जिल्ह्याला दोन दिवस यलो अलर्टचा इशारा file photo
जालना

Yellow alert : जालना जिल्ह्याला दोन दिवस यलो अलर्टचा इशारा

७ ते १० जून रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

पुढारी वृत्तसेवा

Yellow alert warning for Jalna district for two days

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात मुंबई येथील कुलाबा वेध-शाळेने ७ व ८ जुन रोजी यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाची चिंता वाढली असतांनाच जालना जिल्ह्यात विजेच्या कडकडाटसह वादळी वाऱ्यात मान्सुनचे आगमन होण्याची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेच्यावतीने ०८ जून रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे व हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

९ व १० जून रोजीही मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मेघगर्जना व वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल पासून दूर रहावे यासह इतर सुचना प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत.

जालना जिल्ह्यात शेतकरी मान्सुनच्या आगमनाची चातक पक्षाप्रमाणे वाट पहात आहेत. पाऊस पडताच जिल्ह्यात खरीपाच्या पेरणीला वेग येण्याची शक्यता आहे. कृष्ष विभागाच्यावतीने १०० मीमी पाऊस पडल्यानंतरच शेतकऱ्यांना पेरण करण्याचे सांगीतले आहे.

...तर संपर्क करा

जालना जिल्ह्यात ७ जुन पासुन यलो अलर्ट जारी करण्यात आला असतांना ७ रोजी दिवसभर कडक ऊन असल्याचे पहावयास मिळाले. यलो अलर्टच्या पार्श्वभुमीवर आपत्कालीन परिस्थितीती उदभवल्यास जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना तसेच नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा असे अवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT