Jalna News : पोषण आहारात सापडले किडे ! file photo
जालना

Jalna News : पोषण आहारात सापडले किडे !

शिऱ्यात आळ्या, तर कडधान्यात काळे भुंगे निघाल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

Worms found in the nutritious meal!

जामखेड, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील जामखेड येथील माळी गल्लीत असलेल्या अंगणवाडी क्रमांक ५ मध्ये बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुमारे आठ दिवसांपूर्वी याच अंगणवाडीत तयार करण्यात आलेल्या शिऱ्यामध्ये अळीसदृश जीव आढळल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यानंतर आता पुन्हा कडधान्यात काळे भुंगे व किडे आढळल्याचे समोर आल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामध्ये किडे आढळल्याच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. या पार्श्वभुमीवर अंगणवाडीला पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्य-कडधान्याची गुणवत्ता, साठवणूक व्यवस्था आणि पुरवठा यंत्रणेची तातडीने चौकशी करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

प्रियदर्शनी अंगणवाडीतील बालिका ओवी महेश विधाटे हिचे वडील महेश विधाटे यांनी बालकांना देण्यात येणाऱ्या आहाराकडे लक्ष दिल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आल्याचे सांगितले. अंगणवाडीतील बालक शंभू नवनाथ फुटाणे यांचे वडील नवनाथ रमेश फुटाणे यांनीही आहाराच्या गुणवत्तेबाबत जागरूकता दाखवत या प्रकाराकडे लक्ष वेधले. पालकांच्या सतर्कतेमुळे अंगणवाडीतील पोषण आहाराचा दर्जा आणि त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धान्याच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पालकांच्या म्हणण्यानुसार, आठ दिवसांपूर्वी अंगणवाडीत करण्यात आलेल्या शिऱ्यामध्ये अळीसदृश जीव आढळला होता. तयार त्यानंतर आता पुन्हा कडधान्यामध्ये किडे आढळल्याने एकाच अंगणवाडीत अल्प कालावधीत अशा घटना पुन्हा घडण्याचे कारण काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

पहिली घटना समोर आल्यानंतर संबंधित धान्यसाठ्याची तपासणी करण्यात आली होती का? उर्वरित धान्य वापरण्यास योग्य आहे का? त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते का? याबाबत संबंधित प्रशासनाने स्पष्टता देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

धान्याच्या गुणवत्तेची तपासणी महत्त्वाची

या प्रकरणात अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांच्यावर थेट दोषारोप करण्यापेक्षा शासनाकडून पुरवठा होणाऱ्या धान्याची गुणवत्ता आणि संपूर्ण पुरवठा व्यवस्थेची चौकशी करणे आवश्यक असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT