Fraud Case : महिलेची १ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक file photo
जालना

Fraud Case : महिलेची १ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक

मुलाचे लग्न लावून देण्याचे आमिष; पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Woman defrauded of ₹1.70 lakh

भोकरदन, पुढारी वृत्तसेवाः मुलाचे लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून एका ५५ वर्षीय महिलेकडून १ लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम उकळून फसवणूक केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील दगडवाडी येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दगडवाडी येथील रहिवासी तक्रारदार सुमनबाई बाबुराव बोर्डे (वय ५५, व्यवसायः घरकाम) यांच्या मुलाचे लग्न लावून देतो असे सांगून आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन केला. १८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ३:१५ वाजताच्या सुमारास दगडवाडी येथे गुड्डू (रा. किन्ही, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर), योगेश बोरसे, यास्मिन व आणखी एक अज्ञात महिला अशा चौघांनी संगनमत करून तक्रारदार महिलेकडून १ लाख ७० हजार रुपये रोख घेतले आणि कोणतीही मुलगी न दाखवता त्यांची फसवणूक करून पसार झाले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुमनबाई बोर्डे यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून १९ सप्टेंबर रोजी रात्री ९:१६ वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार डी. के. बोर्डे यांनी गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT