Jalna Political News : सुशिक्षित युवकांना रोजगार देऊ ! File Photo
जालना

Jalna Political News : सुशिक्षित युवकांना रोजगार देऊ !

बदनापूरच्या रोजगार मेळाव्यात मंत्री लोढा यांची ग्वाही

पुढारी वृत्तसेवा

Will provide employment to educated youth Minister Mangalprabhat Lodha

बदनापुर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात जालना हे औद्योगिकीकरणात झपाट्याने वाढणारे शहर म्हणून नावारुपास येत आहे. येथील तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी तसेच स्वयंरोजगाराच्या वाटा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासन सकारात्मक पावले टाकत आहेत.

स्थानिक औद्योगिक कंपन्यांमध्ये ज्या रोजगार कौशल्याची मागणी असेल त्या व्यवसायातील प्रशिक्षण देऊन उमेदवारात कौशल्य वाढवून कुशल मनुष्यबळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाईल. त्यामुळे प्रत्येकाच्या हाताला काम मिळाल्याने जालना जिल्ह्यातील एकही सुशिक्षीत तरुण बेर ोजगार राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

बदनापूर येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाथ्रीकर कॅम्पस येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, कौशल्य विकास विभाग आयुक्त लहू माळी, कौशल्य विकास विभाग सहायक आयुक्त गणेश चिमणकर, कौशल्य विकास विभाग उपायुक्त विद्या शितोळे, देवेश पाथ्रीकर, सहसंचालक पी.टी.देवतळे, डॉ. जाकेर पठाण यांच्यासह संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मंत्री लोढा म्हणाले की, उद्य- ोजक व शासन एकत्र येऊन काम केले तर निश्चित महाराष्ट्राची भरभराट होईल. याकरिता पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप महत्त्वाची आहे.

लोढा यांनी घेतल्या मॅरेथॉन बैठका

जालना येथे जनसंवाद, जनता दरबार, आयटीआय संदर्भात पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सव जिल्हास्तरीय समिती बैठक, जिल्हा कौशल्य विभाग आढावा, संस्था व्यवस्थापन आदी मॅरेथॉन बैठका घेत लोढा यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT