Jalna News : आज मतदार ठरवणार पालिकेच्या शिलेदारांचे भवितव्य; पक्षश्रेष्ठींची लागणार कसोटी File Photo
जालना

Jalna News : आज मतदार ठरवणार पालिकेच्या शिलेदारांचे भवितव्य; पक्षश्रेष्ठींची लागणार कसोटी

९८ केंद्रांवर होणार मतदान, ४३२ ईव्हीएम सज्ज, तिन्ही पालिकेत २१ उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात

पुढारी वृत्तसेवा

Voters will decide the fate of municipal councilors today

जालना, पुढारी वृत्तसेवा अंबड, परतूर आणि भोकरदन या तिन्ही नगरपालिकांची निवडणुक अंतिम टप्प्यात आली असून, जिल्हा प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. गेल्या आठवडाभरापासून या तिन्ही शहरांत निवडणूक प्रच-राराने जोर धरला होता. बड्या नेत्यांच्या सभा, रॅली, आरोप-प्रत्यारोप, मतदारांना आकर्षित करण्यासाठीच्या प्रचारफेयांनी राजकीय वातावरण तापून गेले. अखेर आज, मंगळवार दि. २ रोजी एकूण ९८ मतदान केंद्रांवर नगराध्यक्ष आणि सदस्यपदासाठी सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच वाजेदरम्यान मतदान होणार आहे. यासाठी ४३२ मतदान यंत्रे तयार ठेवण्यात आले आहे. त्या त्या नगर पालिकेतील मतदार पालिकेच्या शिलेदारांचे भवितव्य ठरविणार आहेत.

दरम्यान, अंबड नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी ५ उमेदवार रिंगणात असून, २९,६५९ मतदार आपला मताधिकार बजावणार आहेत. अंबडमध्ये शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी युती करून उमेदवार उभा केला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी आघाडीची ताकद दाखवली आहे.

परतूर नगरपालिका निवडणुकीत ९ उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी लढत असून, ३३,९६९ मतदार आज निवडणुकीचा कौल देणार आहेत. परतूरमध्येही सदस्य पदासाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवारी दाखल झाली असून ९१ उमेदवार रिंगणात आहेत. भोकरदन नगरपालिकेत ७ उमेदवार नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत. येथे २०,९१६ मतदार मतदान करणार असून ६९ उमेदवार सदस्यपदासाठी स्पर्धेत आहेत. सर्वच पक्षांनी कडवे रणसंग्राम उभारल्याने मतांची विभागणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पालिकेच्या निवडणुकीत आमदार, खासदार, माजी आमदार, मंत्री आदींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अंबडमध्ये भाजपाचे आमदार नारायण कुचे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री राजेश टोपे, आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार हिकमत उढाण, भोकरदन मध्ये भाजपाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे या पिता पुत्राची तर काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर परतूर मध्ये भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मतदान केंद्रावर तगडा पोलिस बंदोबस्त

भोकरदन १ पोलीस उपविभागीय अधिकारी, २ पोलीस निरीक्षक ९, पोलीस कर्मचारी १५०, होमगार्ड ४०, पेट्रोलइंग पार्टी ५, एसआरपीफ २ सेकशन. संवेदनशील इमारती बाहेर बंदोबस्त लावलेला आहे त्या इमारतीची संख्या पाच अंबड : १ पोलीस उपविभागीय अधिकारी, १ पोलिस निरीक्षक, ८ पोलिस उपनिरीक्षक, ११९ पोलीस कर्मचारी, ४८ होमगार्ड याशिवाय गर्दीच्या ठिकाणी पेट्रोलिंग आणि अतिरिक्त बंदोबस्त असणार आहे. परतूर एक उपविभागीय पोलीस अधिकारी, एक पोलीस निरीक्षक, ११ सहायक पोलिस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, ११९ पोलीस शिपाई, ५१ गृहरक्षक तर एसआरपीच्या २ तुकड्या, पेट्रोलिंग ३ युनिट याशिवाय गर्दीच्या ठिकाणी पेट्रोलिंग आणि अतिरिक्त बंदोबस्त असणार आहे.

नगरपालिकानिहाय मतदान केंद्र

भोकरदन : केंद्र : २६, बॅलेट युनिट ८०, कंट्रोल युनिट : ४० अंबड : केंद्र ३६, बॅलेट युनिट १०४, कंट्रोल युनिट ५२ परतूर: केंद्र ३६, बॅलेट युनिट १०४, कंट्रोल युनिट ५२

कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश

सर्व आस्थापना मालकांनी त्यांच्याकडील अंबड, भोकरदन, परतूर नगरपरिषद निवडणूक होणाऱ्या क्षेत्रात मतदार असलेल्या कामगारांना २ डिसेंबर, २०२५ रोजी कामगार, अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सुट्टी महत्त्वाची आहे. तरी महाराष्ट्र शासन परिपत्रकातील आदेशानुसार जिल्ह्यातील अंबड, भोकरदन आणि परतूर नगरपरिषद निवडणूक क्षेत्रातील कामगारांना २ डिसेंबर रोजी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी अ.मा. जाधव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT