Jalna Crime News : मुलांच्या भांडणातून तुंबळ हाणामारी; एकाचा मृत्यू File Photo
जालना

Jalna Crime News : मुलांच्या भांडणातून तुंबळ हाणामारी; एकाचा मृत्यू

वाल्मीकनगर : अठरा वर्षीय युवकाचा खून, दोन महिला जखमी

पुढारी वृत्तसेवा

Violent clash erupts following a quarrel between children; one dead

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरातील वाल्मीकनगर भागात लहान मुलांच्या भांडणाचे पर्यवसान दोन गटांतील तुंबळ हाणामारीत होऊन १८ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. या घटनेत दोन महिला जखमी झाल्या असून, रविवारी दुपारी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास वाल्मीकनगर येथे लहान मुलांच्या भांडणातून दोन गट आमनेसामने आले. सुरुवातीला झालेला वाद काही वेळातच विकोपाला गेला. दोन्ही गटांकडून तलवारी व लोखंडी रॉडचा वापर करत एकमेकांवर हल्ला करण्यात आला. या हाणामारीत सय्यद अहमद सय्यद रियाज (वय १८) याच्या डाव्या बरगडीवर धारदार शस्त्राने गंभीर वार करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

या हाणामारीत दोन महिलाही जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत परिसरात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.

मृत सय्यद अहमद सय्यद रियाज याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनेची माहिती समजताच रुग्णालय परिसरात नातेवाईक व नागरिकांची मोठी गर्दी झाली कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाल्मीकनगर परिसरासह जिल्हा सामान्य रुग्णालयात कडक् पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दिवसा भर रस्त्यावर झालेल्या या खुनाच्या घटनेमुळे जालना शहरात खळबळ उडाली असून, कायदा क सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांची कसरत

जालना शहरात किरकोळ कारणातुन खुनाच्या घटनांमधे वाढ झाली आहे. धारदार शस्त्रोचा वापरही वाढल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. वाढत्याआ हाणामारी व खुनाच्या घटनांमुळे पोलिसांना कायदा व सुव्यवस्थी राखतांना कसरत करावी लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT