Violent animal in Rui area; farmers fear
सुखापुरी, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील रुई परिसरातील शेत शिवारात बिबट्यासदृश हिंसक प्राणी शनिवारी (दि.१९) रोजी सकाळी शेतवस्तीवर राहणाऱ्या काही नागरिकांनी बिबट्यासदृश प्राणी निदर्शनास आल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रुई परिसरातील उत्तरेकडेकडील शेत शिवारात शनिवार सकाळी बिबट्यासदृश हिंसक प्राणी काही शेत वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना आढळून आल्याची माहिती काही तासातच गावभर पसरल्याने खळबळ माजली. याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभागाशी संपर्क करून घटनेची माहीती दिली. तसेच पाऊस झाल्या असल्यामुळे बिबट्यासदृश प्राण्याचे पायाचे पंजाचे जमिनीवर उमटलेले ठशाचे फोटो वन विभागाकडे व्हॉट्सअॅप माध्यमाद्वारे पाठवण्यात आले वन विभागाकडून उमटले ठसे बिबट्याचेच असल्याचे सांगण्यात आले आहे.
याबाबत वनरक्षक के. जे. कदम वनरक्षक चिंचखेड यांना संपर्क केला यावेळी त्यांनी सतर्क राहण्याबाबत सूचना केल्या बिबट्या दिसल्यास काय काळजी घ्यावी, शेतात एकट्याने फिरू नये समूहाने राहावे रात्रीच्या वेळी मोबाईल च्या गाण्याचा मोठ्या आवाजाचा वापर करावा, पाळीव प्राणी बंदिस्त ठेवावेत तसेच लहान मुलांची काळजी घ्यावी.
रात्रीच्या वेळी शक्यतो घराबाहेर पडू नये. शेत वस्ती जवळ लाईट लावावेत बिबट्या समोर दिसलाच तर त्याचा प्रतिकार अथवा त्याला आपल्यापासून धोका वाटेल असे वर्तन करू नये सदरील भाग हा सुपीक असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केल्यामुळे बिबट्या प्राण्यास लपत क्षेत्र चांगले झाले आहे. त्यामुळे सदरील भागात बिबट्याचे प्रमाण दिसून येत आहे.