Jalna News : ग्राम महसूल अधिकारी लाचेच्या सापळ्यात file photo
जालना

Jalna News : ग्राम महसूल अधिकारी लाचेच्या सापळ्यात

५० हजारांची लाच मागितल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

Village Revenue Officer caught in bribery trap

जालना, पुढारी वृत्तसेवा : शेतजमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात सातबारा दुरुस्त करण्यासाठी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी जालना येथील ग्राम महसूल अधिकारी भाऊसाहेब जनार्दन गवारे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक

विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भाऊसाहेब जनार्दन गवारे (वय ४२) हे जालना तहसील कार्यालयांतर्गत कार्यरत आहेत. तक्रारदार हा व्यवसायाने शेतकरी असून खासगी नोकरीही करतो. तक्रारदाराच्या शेतजमिनीच्या व्यवहारासंदर्भात आरोपीने ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.

तक्रारीनुसार, जालना शहरातील रोहिणा खुर्द परिसरातील गट क्रमांक १०४ मधील ४४ आर शेतजमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मदत करण्यासाठी आरोपीने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे तक्रारदाराने ६ ऑक्टोबर २०२६ रोजी एसीबीकडे तक्रार दिली.

तक्रारीची पडताळणी करताना तक्रारदार आणि आरोपी यांची भेट झाली. या वेळी तक्रारदाराकडून ५० हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्यास सहमती दर्शविल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

त्यानंतर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८.४० वाजता जालना येथील भोकरदन नाका परिसरातील आशा हॉस्पिटलजवळील खासगी कारमध्ये तक्रारदाराकडून ५० हजार रुपये स्वीकारल्याचा उल्लेख प्रसिद्धीपत्रकात आहे. आरोपीला ७ ऑक्टोबर रोजी रात्री ८.४० वाजता ताब्यात घेण्यात आल्याचेही नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT