'Vande Bharat' train hits buffalo in Jalna
जालना, पुढारी वृत्तसेवा : मुंबईहुन नांदेडकडे जाणाऱ्या वंदे भारत रेल्वेने जालना शहरातील मुक्तेश्वर तलावाज-वळील रेल्वे फाटकाजवळ म्हैस रेल्वे ट्रॅकवर गेल्याने तिला धडक दिली. या रेल्वेच्या समोरील अपघातात भागातील नोज हेडचे नुकसान झाले. अपघात झाल्याने वंदे भारत रेल्वे सुमारे चाळीस मिनिटे थांबल्यानंतर पुढील प्रवासासाठी रवाना झाली.
वंदे भारत एक्स्प्रेस जालना रेल्वे स्थानकाकडे येत असताना मुक्तेश्वर तलावाजवळ रेल्वे ट्रॅकवर अचानक एक म्हैस रेल्वेसमोर आडवी आली. तेव्हा म्हशीला रेल्वेची जोरदार धडक बसली. यामुळे ट्रेनच्या पुढील भागातील नोज हेडचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने, रेल्वेचे इतर कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. अपघातानंतर ट्रेन सुमारे ४० मिनिटे ट्रॅकवर उभी राहिली.
यामुळे रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वे अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीनंतर रेल्वे जालना स्थानकावर पोहोचली. त्यानंतर पुढे नांदेडकडे रवाना करण्यात आली. वंदे भारत ट्रेन नांदेड ते मुंबई असा प्रवास जालना मार्गे करते आणि परत याच मागनि नांदेडला येते. ही रेल्वे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. रेल्वे ट्रॅकवर जनावरे येत असल्याने यापुर्वीही रेल्वेचे अपघात झाले आहेत.