Two women beaten up over past enmity, molested
शहागड, पुढारी वृत्तसेवा पाठीमागील भांडणाच्या कारणा-वरुन तिघांकडून एकास मारहाण करुन दोन महिलांचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार बुधवार दि. ८ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन तिघाविरोधात गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील शहागड येथे रात्री अंदाजे ८ वाजेच्या सुमारास अन्वर शेख व त्यांचा मुलगा शहानवाज शेख हे हॉटेल मधील काम संपवून दुचाकीने क्र. एम. एच. २१ सी.ई. ५३४५ घरी येत असताना वेशीजवळ चारचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. गाडीचे चालक ढवळे, त्यांचा मुलगा व सागर देव्हडकर यांनी जुन्या भांडणाचा वाद उकरुन अन्वर शेख आणि त्यांची मुलं मुर्शरफ आणि शाहनवाज शेख यांच्यावर चाकू, रॉड आणि काठीने हल्ला चढवला.
यावेळी ज्ञानेश्वर देव्हडकर, हनुमान देव्हडकर, शिवाजी ढवळे, नामदेव तिळवणे यांच्यासह तीन महिलांनी देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अन्वर शेख यांच्याजवळील कॅरीबॅग मध्ये ठेवलेले रोख २ लाख १४ हजार ७०० रुपये खाली पडून गहाळ झाले. ढवळे व हनुमान देव्हडकर यांनी महिलेस पाठीमागूण धरत तिला लज्जा वाटेल असे कृत्य करुन लोटून दिले.
त्या महिलेची सूनेची देखील छेड काढली. स्कूटीवर दगडफेक करत शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. अशी फिर्याद शेख अन्वर यांच्या पत्नीने दिली. त्यांच्या तक्रारीवरुन गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उनिरीक्षक किरण हावले करीत आहे.