जाफ्राबाद : जाफराबाद तालुक्यातील निमखेडा बू. येथील दोन अल्पवयीन मुलांचा पूर्णा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.६) दुपारी घडली. उमेश दादाराव कासारे (वय १०) व प्रेम ज्ञानेश्वर घोरपडे (वय ८) अशी मृत मुलांची नावे आहेत.
निमखेडा बू.गावातील उमेश कासारे, प्रेम घोरपडे यांच्यासह पाच मुले आज (मंगळवारी) दुपारी नदीत पोहायला गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने उमेश व प्रेम बुडाले. दोघेही दिसेनासे झाल्याने अन्य तिघांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते अपयशी ठरले. त्यानंतर घाबरलेल्या तिघांनी गावात जाऊन घटनेची माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेऊन दोघांचाही मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.