Two accused in road robbery case arrested
शहागड, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील महाकाळा येथील राष्ट्रीय महामार्गावर ट्रक थांबवीत ट्रकचालकाच्या डोळ्यात काही तरी फेकून ट्रक चोरून नेणाऱ्या दोन आरोपींना गोंदी पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन तासांत पकडण्यात यश मिळवले. या कारवाईत ट्रकसह ३६ लाख ३३ हजार ११५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अंबड तालुक्यातील महाकाळा येथील राष्ट्रीय महामार्गावर अहिरवार कपंनीचा ट्रक (क्र.एम एच २० डिई ४१०६) हा माल घेऊन कर्नाटकातील बिदर येथे जात असताना दोन जणांनी ट्रकला हात दाखवून थांबविले. यावेळी ट्रक्चालकाने ट्रक थांबविताच आरोपींनी ट्रक चालकाच्या डोळ्यात काही तरी फेकून त्याला ट्रकखाली ओढत मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी मालासह ट्रक पळवून नेला.
गोंदी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन ट्रकचालक लालसिंग अहीरवार यास शहागड येथील सरकारी दवाखान्यात उपचाराकरिता दाखल केले. त्यानंतर ट्रक चोरून घेऊन जाणारा बंडू ऊर्फ रामेश्वर भीमराव वाघमारे (रा. महाकाळा) व समाधान बबन बेंद्रे (रा. अंकुशनगर) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरून नेलेला मालट्रक व कंपनीचा माल असा ३६ लाख ३३ हजार ११५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात आरोपी विरुध्द ट्रकचालक लालसिंग अहीरवार याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना अंबड न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलिस अधिक्षक आयूष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक, आशिष खांडेकर, पोलिस उपनिरीक्षक किरण हावले, पोलिस जमादार रामदास केंद्रे, पो. का शाकेर सिध्दीकी यांनी केली आहे. तपास किरण हावले हे करीत आहेत.
या प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात आरोपी विरुद ट्रकचालक लालसिंग अहीरवार याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना अबंड न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.